पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिलं मत | सुहास कुलकर्णी | अनुभव - फेब्रुवारी २०१९

निवडणुकीच्या रणसंग्रामाणाला सामोरं जाणार्‍या देशातील घडामोडींची संगती लावणारं सदर

अनुभव मासिक - फेब्रुवारी २०१९

इमेज
इल्से कोहलर-रोलेफसन : उंटाच्या प्रेमात पडलेली स्त्री क्षितिजापल्याड काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच आपल्याला जगाच्या कानाकोपर्‍यांचं ज्ञान होत आलं आहे. आजही असेच अनेक भटके आपला सुखासमाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत असतात. आपलं जगणं समृद्ध करणार्‍या अशा अवलियांवर निरंजन घाटे यांनी लिहिलेलं ‘हटके भटके’ हे पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातल्या एका अवलिया महिलेची ही गोष्ट. ‘संगीत रणदुदुंभी’ या जुन्या काळातल्या नाटकात एक गाणं होतं- ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा ।’ त्या गाण्यात माणसाला लागू शकणार्‍या अनेक वेडांची यादी होती- कनक, कामिनी, राजसत्ता, देशभक्ती, असे कैक प्रकार. ही सर्व वेडं पुरुषांना लागतात, असं त्या गाण्यात ध्वनित होतं; पण स्त्रियांनाही अशी वेडं लागू शकतात याचीही अनेक उदाहरणं आहेत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे इल्से कोहलर-रोलेफसन. इल्सेला उंटांनी वेड लावलं. तिने उंटावरच्या संशोधनाच्या कामी स्वतःला वाहून घेतलं. तिचं संशोधनकार्य विशेषतः भारतातल्य