पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजचा बिहार- जिगसॉचे काही तुकडे

इमेज
-सुरज महाजन , अजय नेमाणे ‘ युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम ’ शी संबंधित विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या काळात भटकंती करून लिहिलेले  हा  लेख . एक बिहारमध्ये पंधरा दिवसांचा मुक्काम ठोकून घेतलेल्या अनुभवांवर आधारित , तर दुसरा पुण्याच्या शेजारच्या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या दुर्गम भागांमध्ये फेरफटका मारून लिहिलेला .    आजचा बिहार - जिगसॉचे काही तुकडे बिहार . सामाजिक बदलांची देशातील एक महत्त्वाची प्रयोगशाळा . अभ्यासकांना कोड्यात टाकणारा प्रांत . प्रचंड लोकसंख्या - गरिबी - बेकारी - बकाली - गुंडागर्दी - मागासलेपण - जातीपातींची घट्ट समीकरणं अशा अनेक कारणांसाठी देशभर प्रसिद्ध पावलेला . पण गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू पाहते आहे . या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारिता शिकणारे काही विद्यार्थी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने बिहारमध्ये जाऊन थडकले . तेव्हा त्यांना काय दिसतं ? पंधरा दिवसांच्या मुक्कामात दिसलेले आजच्या बिहारचे हे काही तुकडे . बिहार नावाचं जिगसॉ पझल जोडण्यासाठी मदत करणारे .  आम्ही पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटचे पत्रकारितेचे विद्यार्थी . आमची परीक्षा नुकतीच आटोप

स्वत: पलीकडे

इमेज
-वृषाली जोगळेकर

कोंड्याचा मांडा आणि अन्नाची नासाडी

इमेज
प्रीति छत्रे अन्नाची नासाडी म्हटलं की आपल्याला लग्नकार्यातल्या जेवणावळी किंवा हॉटेलांमधली उष्ट्या अन्नाने ओसंडून वाहणारी टेबलं आठवतात; पण अन्नाच्या नासाडीचा आवाका त्यापलीकडेही बराच मोठा आहे. मध्यंतरी वर्तमानपत्रात आतल्या कुठल्या तरी पानावर एक छोटंसं वृत्त प्रकाशित झालं होतं. ‘कचराकुंड्यांची पाहणी करून वाचवले 1.2 कोटी रुपये’- अशा साधारण अर्थाचा तो मथळा होता. त्यात जे दिलेलं होतं ते चमकवणारं होतं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर खानपान-सेवा पुरवणार्‍या एका कंपनीचे एक उच्चपदस्थ अधिकारी त्या दिवशी विमानतळावर आपल्या विमानाची वाट पाहत थांबलेले होते. त्यांच्या कंपनीच्या ‘फुड लाऊंज’ची एक मोठी, आधुनिक ‘टपरी’ तिथे होतीच. त्यांना दिसलं, की टपरीच्या आसपास ठेवलेल्या कचराकुंड्या भरून वाहत होत्या. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांचं विमान जरा लेट झालं आणि त्यांना त्यावर विचार करण्यास थोडी उसंत मिळाली. त्यांनी काय केलं? सरळ दोन हॅण्डग्लोव्ह्ज चढवले आणि एका कचराकुंडीची पाहणी करायला सुरुवात केली. ती इतकी भरून का वाहत होती, लोकांना तिथे मिळणार्‍या अन्नाची चव आवडत नव्हती का, ते त्यांना तपासाय

नवनिर्मितीचं बोन्साय होण्याच्या काळात..

इमेज
अनुभव फेब्रुवारी 2019
इमेज
इल्से कोहलर-रोलेफसन : उंटाच्या प्रेमात पडलेली स्त्री क्षितिजापल्याड काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच आपल्याला जगाच्या कानाकोपर्‍यांचं ज्ञान होत आलं आहे. आजही असेच अनेक भटके आपला सुखासमाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत असतात. आपलं जगणं समृद्ध करणार्‍या अशा अवलियांवर निरंजन घाटे यांनी लिहिलेलं ‘हटके भटके’ हे पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातल्या एका अवलिया महिलेची ही गोष्ट. ‘संगीत रणदुदुंभी’ या जुन्या काळातल्या नाटकात एक गाणं होतं- ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा ।’ त्या गाण्यात माणसाला लागू शकणार्‍या अनेक वेडांची यादी होती- कनक, कामिनी, राजसत्ता, देशभक्ती, असे कैक प्रकार. ही सर्व वेडं पुरुषांना लागतात, असं त्या गाण्यात ध्वनित होतं; पण स्त्रियांनाही अशी वेडं लागू शकतात याचीही अनेक उदाहरणं आहेत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे इल्से कोहलर-रोलेफसन. इल्सेला उंटांनी वेड लावलं. तिने उंटावरच्या संशोधनाच्या कामी स्वतःला वाहून घेतलं. तिचं संशोधनकार्य विशेषतः भारतातल्य