पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुभव मासिक जुलै २०२०

इमेज
  मुखपृष्ठ  छायाचित्र :  प्रणव संत

लवकरच येत आहे, समकालीन प्रकाशनाचं नवीन पुस्तक - ‘जग थांबतं तेव्हा..’ (लॉकडाऊन काळातल्या नोंदी)

इमेज

अनुक्रमणिका जुलै २०२०

कोरोना-लॉकडाऊन विशेष आजच्या संकटात महात्मा गांधींनी काय केलं असतं ?   : डॉ. अभय बंग  विषाणूचा विषम फेरा :  मंगेश सोमण  दावे म्हणजे औषध नव्हे : डॉ. सचिन लांडगे  कोरोनासोबत जगताना : मुकेश माचकर  कोरोना आणि स्पर्शाची भाषा : वंदना कुलकर्णी  ते दहाजण : फे. सीन. एजाझ , अनुवाद : सुकुमार शिदोरे    आरोग्यकथा : कोरोना पल्याडच्या रुग्णहक्कांसाठी लढताना : प्रशांत खुंटे  एक बेदखल मृत्यू : डॉ. शंतनू अभ्यंकर  माणसं समाजाला न झेपलेला लेखक : रत्नाकर मतकरी : आनंद अवधानी   लेख विळखा ड्रॅगनच्या बँकेचा : विश्‍वास उटगी  वनक्षेत्रातली वाढ कितपत खरी ?  : गुरुदास नूलकर    थोडक्यात महत्वाचं स्वतःपलीकडे : वृषाली जोगळेकर 

आजच्या संकटात महात्मा गांधींनी काय केलं असतं - डॉ. अभय बंग

इमेज
  कोरोनासाथीच्या या संकटकाळात काय केलं जायला हवं होतं आणि आणखी काय करता येऊ शकतं याबद्दल असंख्य मतमतांतरं आहेत. या संकटात महात्मा गांधींनी काय केलं असतं , हाही  विचार अशा वेळी मनात आल्यावाचून राहत नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी तो विचारप्रयोग करून पाहिला.. आजचं वैश्विक संकट तिहेरी आहे . कोविद रोगाची महामारी , व्यापक व खोल आर्थिक मंदी आणि मानवीय अस्तित्वालाच धोक्यात टाकणारे पर्यावरणीय बदल . या शिवाय , अशा स्थितीत मार्ग दाखविणार् ‍ या राजकीय व नैतिक नेतृत्वाचा आज जगभरात अभाव आहे . त्यामुळे उत्तर अन्यत्र शोधायला हवं . महात्मा गांधींसमोर आजचं आव्हान उभं असतं तर त्यांनी काय केलं असतं ? त्यांचं उत्तर कुठे शोधायचं ? ते त्यांनी स्वत : च सांगून ठेवलं आहे , ‘ माझं जीवनच माझा संदेश आहे .’ आपल्याला गांधींचं उत्तर त्यांच्या जीवनात शोधावं लागेल . त्यांच्या उत्तरांमधे काही वैशिष्ट्यं समान असतील . एक , ते दुसर् ‍ यांना उपदेश करण्याऐवजी प्रथम स्वत : कृतीत उतरवतील . म्हणूनच आत्मस्तुती वाटावं अशा तर् ‍ हेचं वाक्य - माझं जीवनच माझा संदेश आहे - ते बोलू शकले . आपण बोलू शकतो का ?

विषाणूचा विषम फेरा - मंगेश सोमण

इमेज
  कोव्हिडच्या साथीचा उद्योग-व्यवसायांवरचा परिणाम तर विषम होताच , पण कोव्हिडोत्तर जगात देशातल्या सशक्त आणि अशक्त व्यवसायांमधलं व्यावसायिक अंतर आणखी रुंदावलेलं दिसेल , असा औद्योगिक विश्लेषकांचा अंदाज आहे. जगासाठी कोव्हिडचा फेरा हा सुरुवातीच्या आडाख्यांच्या मानाने जास्त चिवट आणि विध्वंसक ठरला आहे. भारताच्या उष्ण तापमानात कोव्हिडचा परिणाम सौम्य ठरेल , ही आशा प्रत्यक्षात उतरली नाही. चीनमधल्या अनुभवावरून कोव्हिडचा आलेख दोनेक महिन्यांमध्ये उताराला लागतो , असा अदमास होता. पण तो सार्वत्रिक ठरला नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यातली परिस्थिती अशी आहे की , भारत आणि ब्राझिलमध्ये कोव्हिडचा आलेख अजूनही चढाच आहे , तर अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये कोव्हिडचं दुसरं आवर्तन सुरू झालंय. एकंदर लोकसंख्येच्या मानाने भारतातलं कोव्हिड मृत्यूंचं प्रमाण जागतिक तुलनेत कमी असलं तरी कोव्हिडची भारतीय अर्थव्यवस्थेने मोजलेली किंमत ही इतर अर्थव्यवस्थांच्या बरोबरीने , आणि बर्‍याच आशियाई देशांच्या तुलनेत मोठी ठरण्याची लक्षणं आहेत. कोव्हिडवर ठाम वैद्यकीय उत्तर सापडेपर्यंत कोव्हिडचं सावट आपल्या आर्थिक व्यवहारांवर पडतच

विळखा ड्रॅगनच्या बँकेचा - विश्‍वास उटगी

इमेज
  गलवान खोर्‍यातील चकमकीत आपले २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधाची लाट उसळली आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्यापासून चायनीज खाद्यपदार्थ पुरवणार्‍या हॉटेलांवरच्या बंदीपर्यंत अनेक प्रकारची आवाहनं केली जाताहेत. पण चीन-भारत आर्थिक संबंध हे त्याहून किती तरी अधिक गुंतागुंतीचे आहेत.  त्यापैकी एका मुद्द्याचा ऊहापोह करणारा हा लेख.  जागतिक बँक , आयएमएफ व एडीबीच्या ताकदीची आपल्या नियंत्रणाखाली असलेली एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक चीनने २०१६ मध्ये स्थापन केली आहे.  या बॅँकेमध्ये भारताचे हितसंबंध कसे अडकले आहेत याची चर्चा. चीन आणि भारत यांच्यातील संबंधांची मला एका वेगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे. बरोबर दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनप्रणित एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे अधिकारी यांच्यात करार झाला. या करारान्वये २०० कोटी डॉलर्सचं कर्ज या बँकेने भारताला दिलं. ही बँक नेमकी काय आहे , तिच्याकडून मिळालेलं कर्ज कोणत्या कारणांसाठी वापरलं जात आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे. अमेरिका व चीन या देशांतील आयात-निर्यात व्यापारात आज चीन अमेरिकेवर मात करत आह

दावे म्हणजे औषध नव्हे! - डॉ. सचिन लांडगे

इमेज
कोरोनाच्या विषाणूबरोबरच सध्या जगात त्यावरच्या उपायांच्या जाहिरातींनी धुमाकूळ घातला आहे. पण उपाय म्हणजे उपचार नव्हे आणि दावे म्हणजे औषधं नव्हेत.  औषधं-लस-टेस्टिंग यामागचं विज्ञान समजावून सांगणारा लेख.   वृत्तवाहिन्या कुठलाही उपाय किंवा कुठलीही गोष्ट ‘औषध सापडलं’ म्हणून दाखवू शकतात. पण वाहिन्यांवर दाखवलंय किंवा अनेकजण घेत आहेत , म्हणून ते ‘औषध’ होत नसतं! उपाय , उपचार , लस आणि औषध म्हणजे नेमकं काय ? १. एखादा रोग किंवा विकार आपल्या शरीरात आल्यावर कसा वागेल , काय परिणाम करेल , तो कधी जाईल याचा अभ्यास करणार्‍या मॉडर्न मेडिसिनच्या (अ‍ॅलोपॅथीला आता मॉडर्न मेडिसिन म्हटलं जातं.) शाखेला ‘पॅथॉलॉजी’ म्हणतात आणि आपल्या शरीरात इन्फेक्शन/रोग गेल्यावर किंवा विकार झाल्यावर तो शरीरात जो धुमाकूळ माजवतो , त्याचा ‘नॅचरल कोर्स’ कसा असतो , त्याला ‘पॅथॉजेनेसिस’ म्हणतात. ‘कोविड-१९’ हा विषाणू ८० ते ८५ टक्के लोकांमध्ये काहीच लक्षणं दाखवत नाही. १० ते १५ टक्के लोकांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणं दिसतात. ७ ते १० टक्के लोक आयसीयूत जातात , तर तीन ते पाच टक्के लोक मरण पावतात , असा आतापर्यंतचा अभ्यास आहे. त्याम