पोस्ट्स

USJ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

त्यांच्या पाठीवरून शहरं धावतात.. - प्रशांत खुंटे, प्रतीक पुरी

इमेज
युनिक फीचर्स’च्या निवडक महत्त्वाच्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘शोधा खोदा लिहा’ या पुस्तकाचा दुसरा भाग नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातील एक लेख. आपली शहरं उभी राहतात आणि चालतात ती अनाम, कष्टकरी माणसांच्या मेहनतीने. ही माणसं स्वत: श्रम करून इतरांचं जगणं सुकर करतात आणि त्या बदल्यात आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात; पण असंघटित क्षेत्रातील या कामगारांना ना समाजाची सहानुभूती आहे, ना कायद्याचं भक्कम संरक्षण, हे अधोरेखित करणारा. कुठल्याही एका शहरातली सकाळ. माणसांची आपापल्या कामधंद्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लगबग सुरू असते. दुकानांची शटर्स वर जात असतात. बसस्टॉप्स, रेल्वे स्टेशन्सवर गर्दी वाढू लागत असते. हळूहळू जिकडे-तिकडे गजबजाट जाणवू लागतो. या घाईगर्दीत एखाद्या नाक्यावर आपापली अवजारं घेऊन माणसं गोळा होऊ लागतात. कुणी एकेकटा असतो, कुणाचे जथे असतात. ङ्गडक्यात बांधलेल्या भाकर्यांसोबत ब्रश, डबे, छिन्नी, हातोडे, करवत इत्यादी सामानाच्या पिशव्या, ङ्गावडी, घमेली, कुदळी असं काय काय त्यांच्याकडे असतं. बरेचजण सड्या हातानेही आलेले असतात. शेकडो, हजारोंच्या संख्येत अशी मा...

आजचा बिहार- जिगसॉचे काही तुकडे

इमेज
-सुरज महाजन , अजय नेमाणे ‘ युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम ’ शी संबंधित विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या काळात भटकंती करून लिहिलेले  हा  लेख . एक बिहारमध्ये पंधरा दिवसांचा मुक्काम ठोकून घेतलेल्या अनुभवांवर आधारित , तर दुसरा पुण्याच्या शेजारच्या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या दुर्गम भागांमध्ये फेरफटका मारून लिहिलेला .    आजचा बिहार - जिगसॉचे काही तुकडे बिहार . सामाजिक बदलांची देशातील एक महत्त्वाची प्रयोगशाळा . अभ्यासकांना कोड्यात टाकणारा प्रांत . प्रचंड लोकसंख्या - गरिबी - बेकारी - बकाली - गुंडागर्दी - मागासलेपण - जातीपातींची घट्ट समीकरणं अशा अनेक कारणांसाठी देशभर प्रसिद्ध पावलेला . पण गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू पाहते आहे . या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारिता शिकणारे काही विद्यार्थी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने बिहारमध्ये जाऊन थडकले . तेव्हा त्यांना काय दिसतं ? पंधरा दिवसांच्या मुक्कामात दिसलेले आजच्या बिहारचे हे काही तुकडे . बिहार नावाचं जिगसॉ पझल जोडण्यासाठी मदत करणारे .  आम्ही पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटचे पत्रकारितेचे विद्यार्थी . ...