पोस्ट्स

anubhav masik लेबलसह पोस्ट दाखवत आहे

‘मी ते आपण' : एक एव्हरेस्ट चढताना...

इमेज
  एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. गिर्यारोहकांच्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गिरिप्रेमीच्या चमूने २०१२ साली एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. भारतातली ती सर्वात मोठी आणि यशस्वी नागरी मोहीम ठरली. पण त्या मोहिमेत खुद्द झिरपे मात्र एव्हरेस्टवर चढू शकले नाहीत. तसं असलं तरीही त्यांचं समाधान आणि आनंद प्रत्यक्ष चढाईपेक्षा कमी नव्हता.  एव्हरेस्ट दिनानिमित्त वाचायलाच हवा असा एक आगळा अनुभव.    ते १९९१ साल होतं. गिर्यारोहणाची चटक लागून मला दहा वर्षं होऊन गेली होती. गिर्यारोहणातले बेसिक आणि अँडव्हान्स कोर्स करून झाले होते. सह्याद्री पालथा घालून झाल्यावर आता हिमालयातल्या शिखरांची ओढ लागली होती. आणि त्याच ओढीने गंगोत्रीमधल्या एका अतिशय कठीण शिखराच्या अपयशी मोहिमेहून मी परतत होतो. या शिखराने आम्हाला एकदा नव्हे, दोनदा पराभूत केलं होतं. त्या शिखराच्या भव्यतेकडे पाहत मी परतलो तो दिवस मला अजूनही आठवतो... गंगोत्रीमधलं सहा हजार मीटर उंचीवरचं हे मंदा शिखर आमच्या कल्पनेपेक्षा खूपच भव्य आणि अवघड निघालं होतं. मी, अविनाश फौजदार, जगदीश चाफेकर, संजय डोईफोडे, जितेंद्...

मुक्काम कात्रीतलं काबुल - निळू दामले

इमेज
 अनुभव दिवाळी २००८ २००३ साली काबूलला गेलो होतो तेव्हा अमेरिकन सेना आणि अफगाणिस्तानमधल्या विविध गटांनी तयार केलेला उत्तरी मोर्चा या दोन सैन्यांनी तालिबानचा पराभव केला होता. अमेरिकेच्या मदतीनं अफगाणिस्तानमधे अहमद करझाईंचं एक अस्थायी सरकार तयार झालं होतं. अमेरिका आणि दोस्त देशांच्या दबावाखाली करझाई यांनी आश्वासन दिलं होतं, की मी अफगाणिस्तानात लोकशाही स्थापन करेन आणि अफगाणिस्तानाची व्यवस्था लावून प्रगती करेन. काबूल विमानतळावर माझं विमान घिरट्या घालत होतं तेव्हा खाली विमानतळाच्या आसपास मोडकी विमानं, लष्करी गाड्या, रणगाडे, जीप्स दिसत होत्या. विमान आणखी थोडं खाली आलं तेव्हा काबूल शहरातल्या उद्ध्वस्त इमारती, पडलेली घरं दिसत होती. आता २००७ साली मी पुन्हा काबूलला निघालो होतो. मधल्या काळात करझाई यांनी एक लोया जिरगा म्हणजे महासभा भरवली. सर्व अफगाण राजकीय गट, जमातींचे प्रमुख, मुल्ला-मौलवी, ज्येष्ठ नागरिक एकत्र केले. त्यांच्या संमतीनं निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला. तालिबान आणि टोळीवाले यांचा विरोध असूनही  मतदारनोंदणी करून निवडणूक घेतली. रीतसर सरकार स्थापन केलं. अमेरिका, युरोपीय देश, ब...

त्यांच्या पाठीवरून शहरं धावतात.. - प्रशांत खुंटे, प्रतीक पुरी

इमेज
युनिक फीचर्स’च्या निवडक महत्त्वाच्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘शोधा खोदा लिहा’ या पुस्तकाचा दुसरा भाग नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातील एक लेख. आपली शहरं उभी राहतात आणि चालतात ती अनाम, कष्टकरी माणसांच्या मेहनतीने. ही माणसं स्वत: श्रम करून इतरांचं जगणं सुकर करतात आणि त्या बदल्यात आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात; पण असंघटित क्षेत्रातील या कामगारांना ना समाजाची सहानुभूती आहे, ना कायद्याचं भक्कम संरक्षण, हे अधोरेखित करणारा. कुठल्याही एका शहरातली सकाळ. माणसांची आपापल्या कामधंद्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लगबग सुरू असते. दुकानांची शटर्स वर जात असतात. बसस्टॉप्स, रेल्वे स्टेशन्सवर गर्दी वाढू लागत असते. हळूहळू जिकडे-तिकडे गजबजाट जाणवू लागतो. या घाईगर्दीत एखाद्या नाक्यावर आपापली अवजारं घेऊन माणसं गोळा होऊ लागतात. कुणी एकेकटा असतो, कुणाचे जथे असतात. ङ्गडक्यात बांधलेल्या भाकर्यांसोबत ब्रश, डबे, छिन्नी, हातोडे, करवत इत्यादी सामानाच्या पिशव्या, ङ्गावडी, घमेली, कुदळी असं काय काय त्यांच्याकडे असतं. बरेचजण सड्या हातानेही आलेले असतात. शेकडो, हजारोंच्या संख्येत अशी मा...