पोस्ट्स

kabul लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुक्काम कात्रीतलं काबुल - निळू दामले

इमेज
 अनुभव दिवाळी २००८ २००३ साली काबूलला गेलो होतो तेव्हा अमेरिकन सेना आणि अफगाणिस्तानमधल्या विविध गटांनी तयार केलेला उत्तरी मोर्चा या दोन सैन्यांनी तालिबानचा पराभव केला होता. अमेरिकेच्या मदतीनं अफगाणिस्तानमधे अहमद करझाईंचं एक अस्थायी सरकार तयार झालं होतं. अमेरिका आणि दोस्त देशांच्या दबावाखाली करझाई यांनी आश्वासन दिलं होतं, की मी अफगाणिस्तानात लोकशाही स्थापन करेन आणि अफगाणिस्तानाची व्यवस्था लावून प्रगती करेन. काबूल विमानतळावर माझं विमान घिरट्या घालत होतं तेव्हा खाली विमानतळाच्या आसपास मोडकी विमानं, लष्करी गाड्या, रणगाडे, जीप्स दिसत होत्या. विमान आणखी थोडं खाली आलं तेव्हा काबूल शहरातल्या उद्ध्वस्त इमारती, पडलेली घरं दिसत होती. आता २००७ साली मी पुन्हा काबूलला निघालो होतो. मधल्या काळात करझाई यांनी एक लोया जिरगा म्हणजे महासभा भरवली. सर्व अफगाण राजकीय गट, जमातींचे प्रमुख, मुल्ला-मौलवी, ज्येष्ठ नागरिक एकत्र केले. त्यांच्या संमतीनं निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला. तालिबान आणि टोळीवाले यांचा विरोध असूनही  मतदारनोंदणी करून निवडणूक घेतली. रीतसर सरकार स्थापन केलं. अमेरिका, युरोपीय देश, ब...