पोस्ट्स

कोरोना विषाणू कोडं उगमाचं! - आरती हळबे

इमेज
सार्स-कोव्ह २ , म्हणजेच कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला , तो नैसर्गिकरीत्या तयार झाला , प्रयोगशाळेतून त्याची गळती झाली की तो मुद्दाम बनवला गेला यावर जगात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या सिद्धांतांचे आधार काय आहेत आणि ही चर्चा सध्या कुठवर येऊन ठेपली आहे याचा वेध. सूक्ष्मदर्शका  शिवाय न दिसणारा एक सूक्ष्म जीव आता वर्षभरापेक्षा अधिक काळ संपूर्ण जगात उलथापालथ घडवून आणतोय. सार्स-कोव्ह २ (SARS-CoV2) या नावाने ओळखला जाणारा हा विषाणू सर्वप्रथम चीन येथील वुहान या शहरात आढळला. माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा हा विषाणू जग हादरवून टाकणार्‍या कोविड-१९ पॅनडेमिकला कारणीभूत आहे. प्राण्यांना संसर्ग करणार्‍या विषाणूंमध्ये नैसर्गिक म्युटेशन होऊन मनुष्याला संसर्गित करणारा सार्स-कोव्ह-२ हा विषाणू तयार झाला असावा असा जगभरातील शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज होता. वुहान येथील मार्केटमध्ये मांसासाठी जिवंत वन्य प्राण्यांची खरेदी-विक्री होते त्यात वटवाघळंही असतात. तिथेच या विषाणूने वटवाघळांच्या पेशींवरून मनुष्याच्या पेशींवर उडी मारली असावी असं मानलं जातं. सार्स-कोव्ह २ नैसर्गिकपणे त...

त्यांच्या पाठीवरून शहरं धावतात.. - प्रशांत खुंटे, प्रतीक पुरी

इमेज
युनिक फीचर्स’च्या निवडक महत्त्वाच्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘शोधा खोदा लिहा’ या पुस्तकाचा दुसरा भाग नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातील एक लेख. आपली शहरं उभी राहतात आणि चालतात ती अनाम, कष्टकरी माणसांच्या मेहनतीने. ही माणसं स्वत: श्रम करून इतरांचं जगणं सुकर करतात आणि त्या बदल्यात आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात; पण असंघटित क्षेत्रातील या कामगारांना ना समाजाची सहानुभूती आहे, ना कायद्याचं भक्कम संरक्षण, हे अधोरेखित करणारा. कुठल्याही एका शहरातली सकाळ. माणसांची आपापल्या कामधंद्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लगबग सुरू असते. दुकानांची शटर्स वर जात असतात. बसस्टॉप्स, रेल्वे स्टेशन्सवर गर्दी वाढू लागत असते. हळूहळू जिकडे-तिकडे गजबजाट जाणवू लागतो. या घाईगर्दीत एखाद्या नाक्यावर आपापली अवजारं घेऊन माणसं गोळा होऊ लागतात. कुणी एकेकटा असतो, कुणाचे जथे असतात. ङ्गडक्यात बांधलेल्या भाकर्यांसोबत ब्रश, डबे, छिन्नी, हातोडे, करवत इत्यादी सामानाच्या पिशव्या, ङ्गावडी, घमेली, कुदळी असं काय काय त्यांच्याकडे असतं. बरेचजण सड्या हातानेही आलेले असतात. शेकडो, हजारोंच्या संख्येत अशी मा...

दानिश सिद्दिकी : देशधर्मापल्याडचा माणूस - इंद्रजित खांबे

इमेज
  एखाद्या व्यक्तीचा ‘ मित्र ’ म्हणून उल्लेख करण्यासाठी नेमके कोणते मापदंड लागतात ? तुमची व त्या व्यक्तीची कित्येक वर्षांची ओळख हा मापदंड मैत्री सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेलच असं नाही . कित्येक वर्षं एकमेकांना ओळखत असूनही दोन व्यक्ती कधी मित्र होऊ शकत नाहीत . तर काही वेळा एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो . दानिश सिद्दिकीचा माझा अनुभव असाच म्हणता येईल . त्या एका अनुभवामुळे दानिशला मी माझा जवळचा मित्र म्हणू शकतो . त्यामुळे हा लेख मी दानिश सिद्दिकी नावाचा एक महान मित्र गमावल्याच्या दुःखातून लिहीत आहे . दानिशचं काम मी गेली कित्येक वर्षांपासून पाहत आलोय . त्याच्या कामापासून प्रेरणा घेत आलोय . परंतु त्याला मित्र का म्हणतोय हे कळण्यासाठी एक प्रसंग मला लिहिला पाहिजे . मे महिन्याच्या अखेरीस एक दिवस मला दानिशचा मेसेज आला . तो वाचून मी आनंद आणि कृतज्ञतेच्या भावनेने शहारून गेलो होतो . तो संदेश असा होता - प्रिय इंद्रजित , तू आणि तुझं कुटुंब सुखरूप असाल अशी आशा आहे . अपघाताने का होईना मी तुझं काम पाहिलं . ते पाहणं माझ्यासाठी ब्लेसिंग होतं . कितीतरी वेळ मी ते ...

अनुभव मासिक - ऑक्टोबर २०२०

इमेज
  मुखपृष्ठ छायाचित्र : प्रणव संत

ऑक्टोबर २०२० - अनुक्रमणिका

  लेख धाकल्या भावंडांसमोरचा आर्थिक पेच : मंगेश सोमण   आरोग्य योजनांचं ‘ गरीब ’ वास्तव : प्रशांत खुंटे   हवामानामुळे बदलतोय माणूसही : निरंजन घाटे  टिळक - गांधी : नेतृत्वाची सांधेजोड : नरेन्द्र चपळगावकर  निर्वासित मुलांना रिझवणारे ‘ जोईज ’ : प्रीति छत्रे     माणसं आमटे वृक्षाच्या छायेत : सुहास कुलकर्णी    निमित्त कोव्हिड लॉकडाऊन विस्थापन : आणखी काही अनुभव : सायली तामणे   लॉकडाऊनच्या पत्रकारी नोंदी : शेखर देशमुख     ललित कोरोनाकथा : मुकेश माचकर   हार : अझहर अबरार , अनुवाद : सुकुमार शिदोरे    थोडक्यात महत्त्वाचं स्वतःपलीकडे : वृषाली जोगळेकर   

धाकल्या भावंडांसमोरचा आर्थिक पेच - मंगेश सोमण

इमेज
    कोव्हिडच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या राज्यं मेटाकुटीला आली आहेत. कोव्हिड नियंत्रणासाठी होणरा मोठा खर्च आणि लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेला बसलेली खीळ या दोन्हीच्या जोडीला केंद्राकडून जीएसटी भरपाई होत नसल्याने केंद्राची धाकली भावंडं असलेल्या राज्यांपुढे आर्थिक पेच निर्माण झालाय. या पेचामागची नेमकी कारणं काय आहेत याची चर्चा करणारा लेख. आर्थिक संबंधांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतीय संघराज्यात केंद्र सरकार मोठ्या भावाच्या आणि राज्य सरकारं धाकट्या भावाच्या भूमिकेत मानता येतील. केंद्र सरकारकडे करमहसूल गोळा करण्याचे जास्त अधिकार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नेमणुका केंद्र सरकार करतं. केंद्र सरकारच्या कर्जाला रोखे बाजारातील मंडळी निखळ , जोखीमविरहित सार्वभौम कर्ज मानतात. राज्य सरकारांना मात्र कर्जउभारणी करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत केंद्र सरकारची बाजू अशी वरचढ असली तरी राज्य सरकारांवर कायदा सुव्यवस्था राखण्याची आणि आरोग्य-शिक्षणासह इतर अनेक महत्त्वाच्या सोयी जनतेला पुरवण्याची प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे ढोबळमानाने पाहिलं तर देशातील एकूण ...