थोडी टिप्पणी बरीच अतिशयोक्ती आणि यथेच्छ खिल्ली
देशात कुठलीही वेगळी
घटना घडली की हल्ली सोशल मिडियाच्या कृपेने लोकांच्या सर्जनशीलतेला पूर येतो.
करोना आणि लॉकडाऊनकाळही त्याला अपवाद कसा असणार? लोकांच्या कलेक्टिव्ह इंटेलिजन्सची
ही उदाहरणं नोंदवून ठेवणंही तितकंच गरजेचं!
लॉकडाऊन सुरुवातीचा काळ
रस्त्यावरच्या कुत्र्यांना वाटत असेल माणसांना महापालिकावाल्यांनी उचलून नेलं की काय?
-----
प्रत्येक आजारावर आयुर्वेदात कुठला ना कुठला काढा असतो.
कोरोनावर देखील आहे.
२१ दिवस घरात ‘काढा’
-----
‘घर बसल्या कमवा २०-२५ हजार’ वाल्यांचा
नंबर आहे का कुणाकडे?
-----
बरं झालं कोरोना व्हायरस नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. नाहीतर लोकांनी त्याला पहायला पण गर्दी केली असती.
-----
सगळे किटाणू, जर्म्स मारणारे साबण, सॅनिटायझर, फ्लोअर क्लीनरच्या जाहिरातीत ९९.९९ टक्के किटाणू मेल्यानंतर भिंगातून राहिलेला एक किटाणू दाखवतात ना?
तोच तो कोरोना!
-----
ज्या प्रकारे लोक रोज रोज नवीन पदार्थ बनवून पोस्ट टाकत आहेत, मी तुम्हाला आठवण करून देतो की आपल्याला पृथ्वी वरून कोरोना संपवायचा आहे, किराणा नाही.
-----
आज सकाळी गॅलरीत उभा होतो. सहज एक दोन उड्या मारल्या. तर शेजारच्या गॅलरीतून काकूंनी भक्तिभावाने विचारलं, आज उड्या मारायला सांगितल्या होत्या का? वेळ काय दिली होती?
-----
कोरोनो के साईड इफेक्टस
गेल्या दोन महिन्यांपासून केवळ घरात आणि घरात बसून असल्यामुळे घरातील समोर आलेलं ढळढळीत सत्य.
१. आमच्या घरात गरजेपेक्षा कितीतरी वस्तू जास्त आहेत. ज्यांना घरात का घेतलं आणि अजूनही घरात त्या का आहेत हा एक मोठा प्रश्नच आहे.
२. आमच्या घरात एकूण चारशे बेचाळीस भांडी असून त्यातील केवळ दोनशे बहात्तर भांडी वापरात असतात. (रोज मी भांडे घासतो त्यामुळे ज्ञानात पडलेली माहिती)
३. आमच्या घराचं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर हे साधारणपणे पंचवीस मीटर असून जवळपास ऐंशी चकरा मारल्या की चार किमी चालणं होतं...
४. घरात इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत, इतके कपडे आहेत की साड्या, ओढण्या, कुर्ते, स्कर्ट, सलवार, पँट, शर्ट यांची एकमेकांची गाठ बांधून लांब केले तर पृथ्वीला वेढा मारून त्याची गाठ घालून तिला आकाशात टांगता येईल...
६. आमच्या घरात असेही काही दुर्गम भाग आहेत, जेथे माणूस आणि झाडू कधीही पोहोचलेला नाही.
७. आमच्या घरातील एका बेडशीटवर दोनशे बेचाळीस फुले असून एकशे बहात्तर पानं आहेत...
८. घरात टीव्ही असूनही तो जराही न बघता दिवस काढता येऊ शकतो.
सध्या एवढे बास. अजून बरंच काही आहे. पण ते पुढच्या भागात.
-----
आज इतका कंटाळा आला की सोसायटीत आलेल्या भाजीवाल्याला म्हटलं, ‘भावा, बैस माझ्या घरांत. टी.व्ही.बघ, थोडा आराम कर, चहा/सरबत घे हवंतर’
तो घरी बसला
आणि
मी त्याची हातगाडी घेऊन एक राउंड मारून आलो.
-----
बॉस : मी तुला फोन केला होता, तुझ्या बायकोने सांगितलं, तू स्वयंपाक करतो आहेस. स्वयंपाक झाल्यावर फोन का नाही केलास?
कर्मचारी : सर, मी केला होता तुम्हाला फोन. मॅडमनी सांगितलं, तुम्ही भांडी घासताय.
-----
एखादा डिजिटल रद्दीवाला माहीत असेल तर कळवा.
वृत्तपत्रांची १०० जीबीची डिजिटल रद्दी विकणे आहे.
-----
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी गाईचे शेण उपयुक्त.
कृपया हे करून पहा. बाहेर जाण्यापूर्वी आपले दोन्ही हात गाईच्या ताज्या शेणात बुडवून निघा.
त्याने काय होईल?
१. तुम्ही तुमच्या तोंडाला नाकाला कानाला हात लावणार नाही.
२. इतर कोणीही तुमच्यासोबत हस्तांदोलन करणार नाही.
३. शेणाच्या वासामुळे तुमच्या जवळपास कुणी फिरकणार नाही.
४. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ धुवाल.
याला म्हणतात शेणीटायझर!
-----
घरात बसायची सवय इतकी लागून गेली आहे की लॉकडाऊन संपल्यावर सरकारला पोलिस बळाचा वापर करून बाहेर काढावं लागेल की काय, असं वाटतंय.
-----
आता कसं वाटतंय?
रेल्वेच्या बोगीत बसल्यासारखं वाटतंय. टॉयलेटला जाऊन यायचं आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसायचं.
-----
हल्ली स्वैंपाकघरात इतका वेळ जातो. काल एक कोडं सोडवत होतो ..
TAOLPP अक्षरामधून इंग्लिश शब्द शोधायचा.
हल्लीच्या घर कामाच्या सवयीमुळे मी लगेच सोडवला.
पोळपाट POLPAT.
खरं उत्तर होतं.. LAPTOP
-----
काही मॉडिफाईड मराठी म्हणी
१) आपला तो खोकला, दुसर्याचा तो कोरोना
२) थांब लक्ष्मी, हात धुवायला सॅनिटायजर देते
३) कोरोनाचं पोर, अख्ख्या गावाला घोर
४) गर्वाचे घर लॉकडाउन
५) माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत
-----
तळीरामाच्या बायकोचा उखाणा
वैद्य झाले, डॉक्टर झाले, दारू काही सुटेना..
तुझ्यामुळेच शक्य झाले, पाया पडते कोरोना
-----
अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचं कारण देत दारूची दुकानं उघडली गेली त्यावेळी
आजवर ज्यांना बेवडे समजत होतो, ते अर्थव्यवस्थाचा कणा निघाले!
-----
आज पता चला
शराबी तो दिव्यात्मा है।
जब फ्री में पीतें है ते सरकार बदल देते है
और
जब खरीदकर पीतें है तो अर्थव्यवस्था।
-----
जर दिसलाच कोठे लोळतांना,
अर्थव्यवस्थेचा कणा,
तर त्याला व्यवस्थित घरी आणा,
पाठीवर हात ठेवून,
पुन्हा लढ म्हणा.
-----
आजी आजोबा टीव्हीवर महाभारत बघत होते. तेथे त्यांची नात आली. वय वर्षे दोन. तिने महाभारतातील गांधारीला बघितलं आणि अवाक होऊन उद्गारली,
“ओ आजोबा, तिने मास्क कुठे लावलाय बघा.”
-----
चीनमुळे जगाला आणि बीजेपीमुळे महाराष्ट्राला होत असलेल्या मनस्तापात फक्त उन्नीस बीसचा फरक आहे.
कोविड १९
फडण २०
-----
खूप मोठ्या संशोधनानंतर कोविड-१९ बद्दल हे माहीत झाले आहे की..
१. कारमध्ये ३ व्यक्ती बसल्या असतील तर त्यांना कोरोना पकडणार नाही, पण कारमध्ये चौथी व्यक्ती बसली तर कोरोना त्याच्याकडे आकर्षित होतो.
२. बसमध्ये बसलेले ३० व्यक्ती सुरक्षित असतात. एकतीसावा व्यक्ती कोरोनाचा वाहक असू शकतो.
३. दुचाकीवर मागील व्यक्ती हा कोरोनाच्या निशाण्यावर असू शकतो, पुढचा व्यक्ती सुरक्षित असतो.
४. कोरोना संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत फिरत असतो.
५. तुमच्याकडे पास असेल, तर तुम्ही एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये जाऊ शकता, कोरोना तुम्हाला काहीच करत नाही. तुमच्याकडे पास नसेल तर कोरोना तुम्हाला पकडणार म्हणजे पकडणार.
६. जर तुम्ही हॉटेल मध्ये बसून जेवत असाल, तर कोरोना तुम्हाला पकडणार. रांगेत उभे राहून पार्सल घेऊन घरी जेवले, तर कोरोना तुम्हाला पकडणार नाही.
७. श्रीमंतांच्या लग्नाला थोडीफार जास्त लोकं आली तर कोरोना वाईट वाटून घेत नाही पण गरिबाच्या लग्नाला ५० चे ५१ जरी झाले तर कोरोना वाईट वाटून घेतो.
म्हणून सावधान रहा, सुरक्षित रहा, घरी रहा आणि काळजी घ्या...
-----
कोरोना २०१९-२० मध्ये आलाय याबद्दल कृतज्ञ राहा, २००० साली
आला असता तर दिवसभर नोकिया ३३१० वर ‘सापाचा गेम’ खेळत बसावं लागलं असतं.
-----
डॉक्टर : तू गटारीत कसा काय पडलास?
दारुडा : काय सांगू डॉक्टर साहेब. बिना झाकणाच्या मॅनहोलला सोशल डिस्टन्सिंगचं वर्तुळ समजलो.
-----
ट्रकच्या मागे लिहिता लिहिता
आता माणसांच्यामागे लिहिण्याची वेळ आलीय..
सुरक्षित अंतर ठेवा!
-----
खरी माणुसकी कोरोनाने शिकवली. शेजाऱ्याची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह यावी यासाठी सगळी गल्ली प्रार्थना करतेय.
-----
अहो आजी,
तुम्ही इतक्या वृद्ध असूनही घरातून चोरांना कसे पिटाळून लावले.
आजी हसून म्हणाल्या, त्याचं असं झालं. मी खाली हॉलमध्ये झोपले होते. चोर खिडकीतून घरात घुसले. त्यांनी मला लाथ मारून उठवलं. मला जाग आली पण मी गोंधळले नाही.
चोरांनी विचारलं, माल कुठं ठेवलाय. तिजोरी कुठंय? घरातले बाकीचे कुठे झोपलेत?
मी खोटच पण हजरजबाबीपणे सांगितलं, सगळे पैसा, दागदागिने घेऊन शेतावरच्या घरी राहायला गेलेत. मी एकटीच आहे इथे. आणि बाळांनो, जाताना हात साबणाने स्वच्छ धुऊन जा. मला कोरोना झालाय आणि मला क्वाारंटाइन केलंय.
शून्य मिनिटांत चोरांनी खिडकीतून बाहेर उड्या मारल्या.
स्थळ : अर्थातच तुमचं शहर!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा