मध्यमवर्गाला पॅकेज नव्हे, थाळी वाजवण्याचा कार्यक्रम हवाय - रवीश कुमार





कोविड-१९ने भारतातील मध्यमवर्गाचा एक नवीन चेहरा समोर आणलाय. गेल्या सहा वर्षांतला हा बदल आता स्पष्ट दिसू लागला आहे. विश्लेषक आश्चर्यचकित झालेले आहेत की, नोकरी आणि पगार गमावूनही हा मध्यमवर्ग मूग गिळून का बसलाय? मजुरांच्या दुर्दशेबद्दल मध्यमवर्ग गप्प का आहे? मी याआधीही लिहिलंय आणि आज पुन्हा लिहितो की, जर मध्यमवर्ग आपल्या दुर्दशेबद्दलच गप्प असेल तर तो मजुरांच्या दशेबद्दल कसा बोलेल? मध्यमवर्ग स्थिर नसतो, त्यामुळे त्याची परिभाषाही निश्चित नसते.

मी आजच्या मध्यमवर्गाला मास्टरचामध्यमवर्गम्हणतो. जो एकेकाळी आपल्यामास्टरला घाबरवत होता किंवामास्टरज्याला घाबरत होता, तो मध्यमवर्ग आता राहिलेला नाही. भारतीय मध्यमवर्गाची एक सुप्त इच्छा होती की, एखादा हंटरधारीमास्टरयावा. म्हणूनच त्याला समस्यांवरचा उपाय सैन्याच्या शिस्तीत दिसत होता किंवा हिटलरच्या अवतारात. भारताचा मध्यमवर्ग आता लोकशाहीची आकांक्षा असलेला राहिलेला नाही. त्यामुळेच तो लोकशाहीच्या संस्थांच्या र्हासाचा विरोधकही राहिलेला नाही.

शक्यता अशी आहे की, हा मध्यमवर्ग पगारकपातीमुळे किंवा नोकरी गेल्यामुळे निराश झाला असेल, पण तरीही तो त्याच माहोलासोबत राहू इच्छितोय, जो तो बनवत आलाय. त्याने या माहोलाविरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला पायतळी तुडवण्यासाठी मदत केली आहे. ‘गोदी मीडियाला दर्शक उपलब्ध करून देण्याचं काम याच मध्यमवर्गाने केलं आहे. ‘गोदी मीडियासाठी विरोधीविचारांवर हल्लासुद्धा केलेला आहे. आता जर याच मध्यमवर्गामध्ये नाराजी किंवा बेचैनी असेल तर तो कुठल्या तोंडाने या माध्यमांकडे जाईल? त्यांनागोदी मीडियाबनवण्यात त्याचाही हात आहे. म्हणून तर त्याचं तोंड बांधलं गेलंय.

या देशात कोट्यवधी लोक बेरोजगार झाले असतील तर त्यात मध्यमवर्गातल्या सर्व स्तरांचाही समावेश असेल. पण त्याने एखाद-दुसरा प्रसंग सोडला तर आपली नाराजी बोलून दाखवलेली नाही. आपल्यासाठी बेरोजगार भत्ता मागितलेला नाही. या मध्यमवर्गाने गेल्या सहा वर्षांत विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला पायतुळी तुडवण्याचं काम केलं आहे. त्याला माहीत आहे की, आवाजाला काही अर्थ नाही. तो ज्यागोदी मीडियाचा राखणदार आहे, त्यालाही सांगू शकत नाही की, आमच्याबद्दल आवाज उठवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा एका मध्यमवर्गाची निर्मिती केली आहे, जो आपल्या वर्गहिताचाही राखणदार नाही. त्याचं हित फक्तनरेंद्र मोदीहे आहे. हा राष्ट्राचा म्हणजे सरकारचा वर्ग आहे. हा असा मध्यमवर्ग आहे, ज्याला फक्त सरकारचा उदोउदो करणं आणि उदोउदो करणाऱ्या बातम्या वाचणं यांचीच चाह आहे. या मध्यमवर्गाने आयटी सेल उभा केलाय. त्याच्या भाषेला सामाजिक आधार दिलाय. सरकारच्या बाजूने असलेल्या पत्रकारांनाहिरोबनवलंय. हा वर्ग कुठल्याच बाजूने कमकुवत नाही. त्यामुळे मी अनेक विश्लेषकांना सांगत आलोय की, मध्यमवर्गाच्या मूग गिळून बसण्याला थट्टेवारी घेऊ नका.

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मध्यमवर्गाचं नवं राष्ट्रीय चरित्र तोडू पाहणारे फसले. या मध्यमवर्गाला माहीत आहे की, गेल्या सहा वर्षांत त्याचं उत्पन्न घटलंय. त्याच्या व्यवसायाने गचके खाल्ले आहेत. त्याच्या घराच्या किमती गडगडल्या आहेत सगळं तो जाणून आहे. पण या समस्या त्याच्या प्राधान्यक्रमावर नाहीत. या वर्गाने बेरोजगारीसारखे ज्वलंत मुद्दे भारतीय राजकारणातून संपवून टाकले आहेत. त्यामुळेच जेव्हा हरयाणा सरकारने सांगितलं की, एक वर्ष सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होणार नाही, तेव्हा या मध्यमवर्गाने त्याचं सहर्ष स्वागतच केलं. प्रत्येक राज्यात सरकारी नोकऱ्यांची दुर्दशा झालेली आहे, पण ही ना त्या तरुणांची राजकीय प्राथमिकता आहे, ना त्यांच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांची.

मध्यमवर्गाची ओळख बेरोजगारीची होरपळ आणि नोकरीची चौकट यांतून तयार झाली होती. आजचा मध्यमवर्ग या सीमांपासून मुक्त आहे. मध्यमवर्ग मुद्द्यांचा पक्ष घेणारा वर्ग राहिलेला नाही. मागच्या सहा वर्षांत त्याने अनेक मुद्दे उडवून लावले आहेत. राजकारणाकडे आर्थिक चष्म्यातून पाहणारे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य ठरलेही असतील, पण भारताच्या आजच्या काळात ते चुकीचे आहेत. लक्षात घ्या, मी मध्यमवर्गाला निश्चित नसलेला वर्ग म्हटलं आहे, तो बदलेल तेव्हा बदलेला, पण आज तसा नाहीये.

कुठलाही वर्ग एका परिभाषेत सामावला जाऊ शकत नाही. प्रत्येक वर्गामध्ये अनेक वर्ग असतात. मध्यमवर्गामध्येही एक छोटा वर्ग आहे, तो राजकीय वा सरकारी दबावाचं प्रतिनिधित्व करत नाही. तो आपल्या नैतिकतेला उत्तरदायी आहे. म्हणून तो आपली कमाई खर्चून समाजसेवा करत आहे. पण त्याची ही समाजसेवाहीआता तरी बोलायला हवंया त्याच्या वर्गाच्या भावनेला चालना देऊ शकत नाहीये. मध्यमवर्गातला हा दुसरा वर्ग आपल्या वर्गहितापासून विन्मुख आहे, हताश आहे. पण तो हे स्वीकारायला तयार नाही की, आपल्या वर्गाचा एक मोठा भाग बदलला आहे. त्याचंनव-निर्माणझालं आहे. चांगलं असेल किंवा वाईट असेल, काहीही असो. पण हे नक्की की, हा तो मध्यमवर्ग नाही, ज्याला जुन्या निकषांवर समजून घेता येईल.

या मध्यमवर्गाचीओळख वर्गनाही, तरधर्मआहे. कदाचित धर्माची ओळख अर्धीही असेल. पण त्याच्या नव-निर्माणा धर्माने मोठी भूमिका निभावलीय. हा वर्ग आर्थिक प्रश्नांवरून संचलित किंवा उत्प्रेरित होत नाही. त्याने अनेक वेळा आर्थिक संकटांकडे कानाडोळा केलाय. त्यामुळे विश्लेषकांनी त्याच्या आर्थिक संकटांमध्ये त्याच्या राजकीय शक्यता शोधण्याचा गैरलागू प्रयत्न करू नये. हे स्वीकारायला हवं की, पंतप्रधान मोदी यांनी आपल्यासाठी या वर्गाची निर्मिती केलेली आहे.

हा तो वर्ग आहे ज्याच्या बँक खात्यात १५ लाख जमा झाल्याबद्दल त्याची कितीतरी चेष्टा केली गेली, पण या वर्गाने चेष्टा करणाऱ्यानाच उडवून लावलं. विरोधकांना आशा होती की, १५ लाखांची आठवण करून दिल्यावर या मध्यमवर्गाला ठेच पोहचेल. पण या मध्यमवर्गाने आठवण करून देणार्यांनाच ठेच पोहोचवली. ज्या मध्यमवर्गाने १५ लाखाला महत्त्व दिलं नाही, तेव्हा तो आर्थिक पॅकेजमधल्या पाच-पन्नास हजाराची वाट पाहत बसला असेल? नोटबंदीच्या वेळेस या वर्गालाही फटका बसला, पण त्याने आपल्या राष्ट्रीय प्रतिमेपुढे आपल्या धंद्याच्या बरबादीचा प्रश्न येऊ दिला नाही. विश्लेषकांनी या बदलाचा जरूर अभ्यास करावा, पण यातून राजकीय बदलाची शक्यता गृहित धरू नये. त्यांचं विश्लेषण कुचकामी ठरू शकतं. कारण मध्यमवर्गाचास्वाभिमानबदलला आहे.

मध्यमवर्गाला त्याच्या अनुभवावरून माहीत आहे की, ‘मेक इन इंडियाअयशस्वी ठरलंय. ‘स्मार्ट सिटीया नावावर तो हसतो. तोआत्मनिर्भर भारतची जुमलेबाजीही जाणून आहे. त्याला प्रत्येकफेक न्यूजमाहीत आहे. त्यानेअसत्यालासत्यमानण्याचा पण जाणूनबुजून केलेला आहे. त्यानेगोदी मीडियाला स्वत:चा मीडिया उगाच बनवलेलं नाही! त्याच्यातील राजकारण संपलेलं आहे. त्यामुळे तो राजकीय दबाव निर्माण करू शकत नाही. तो कुणाला तरी आपलं म्हणणं दबक्या आवाजात सांगेल. अगदी मला सांगतानाही तो याची पूर्ण काळजी घेईल की, यामुळे त्याच्यात कुठली राजकीय उलथापालथ सुरू होणार नाही ना. म्हणजे तो मोदींवर अजिबात टीका करणार नाही. तो थाळी वाजवणं सोडून मशाल उंचावणार नाही. तो बॅनर घेऊन मोर्च्यात जाणार नाही. त्यामुळे तो जेव्हा समस्या सांगेल, तेव्हा शांतपणे तिच्याविषयी लिहा, तुमचं काम संपेल.

कोविड-१९च्या महामारीत भारतीय मध्यमवर्गाने स्वत:साठी कुठलीही मागणी केलेली दिसली नाही. येता-जाता त्याने सांगितलंय की, पगारकपात का झाली, नोकरी का गेली, ईएमआय का कमी झाला नाही, पण त्यानंतर आपण काय बोललो हे तो विसरून गेला. आता हे सरकारवर अवलंबून आहे की, त्याने गेल्या सहा वर्षांत ज्या मध्यमवर्गाचंनव-निर्माणकेलं आहे, त्याला तो काय देणार? नाही दिलं तरी सरकारला काही फरक पडणार नाही. कारण त्याने बनवलेली इमारत इतक्या लवकर कोसळणार नाही. हा मध्यमवर्ग त्याचा साथीदार आहे.
एका पत्रकाराच्या नजरेतून मला ही गोष्ट हैराण करते की, मोदी सरकारने मध्यमवर्गाचा काहीच का विचार केला नाही? आणि नाही केला, तर मध्यमवर्गाने आवाज का उठवला नाही? दोन-चार लोक बोलताना दिसले, पण या वर्गाचा समग्र आवाज काही ऐकायला आला नाही.

भारताचा मध्यमवर्ग आता मोठमोठे लेख वाचत नाही, मग त्यात त्याच्या भल्याची का गोष्ट असेना. त्याला सगळं व्हॉटसअॅप, मीममध्ये हवंय. ईएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्यांमध्ये हवंय. मीम हा त्याच्या ज्ञानाचा ईएमआय आहे. त्याचं स्वप्न बदललंय. तो टीक-टॉकवर स्वत:ला सिद्ध करण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे. तुम्ही टीक-टॉकवर मध्यमवर्गाचं जीवन आणि अपेक्षा पाहू शकता. हुशार नेत्याने आर्थिक पॅकेजऐवजी चांगली मालिका दिली, तर मध्यमवर्गाच्या रात्री चांगल्या जातात. तो त्या मालिकेत वापरलेले कपडे आणि बोलले गेलेले संवाद जगू लागतो.

राष्ट्रीय संकटाच्या या काळात मध्यमवर्गाच्या राष्ट्रीय चरित्राचं दर्शनच तुम्ही घडवू शकत नसाल तर तुम्ही कसले समाजशास्त्रज्ञ!



                                                                                                                                             रवीश कुमार
अनुवाद :  राम जगताप
(‘अक्षरनामामधून साभार)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८