‘मी ते आपण' : एक एव्हरेस्ट चढताना...

एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. गिर्यारोहकांच्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गिरिप्रेमीच्या चमूने २०१२ साली एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. भारतातली ती सर्वात मोठी आणि यशस्वी नागरी मोहीम ठरली. पण त्या मोहिमेत खुद्द झिरपे मात्र एव्हरेस्टवर चढू शकले नाहीत. तसं असलं तरीही त्यांचं समाधान आणि आनंद प्रत्यक्ष चढाईपेक्षा कमी नव्हता. एव्हरेस्ट दिनानिमित्त वाचायलाच हवा असा एक आगळा अनुभव. ते १९९१ साल होतं. गिर्यारोहणाची चटक लागून मला दहा वर्षं होऊन गेली होती. गिर्यारोहणातले बेसिक आणि अँडव्हान्स कोर्स करून झाले होते. सह्याद्री पालथा घालून झाल्यावर आता हिमालयातल्या शिखरांची ओढ लागली होती. आणि त्याच ओढीने गंगोत्रीमधल्या एका अतिशय कठीण शिखराच्या अपयशी मोहिमेहून मी परतत होतो. या शिखराने आम्हाला एकदा नव्हे, दोनदा पराभूत केलं होतं. त्या शिखराच्या भव्यतेकडे पाहत मी परतलो तो दिवस मला अजूनही आठवतो... गंगोत्रीमधलं सहा हजार मीटर उंचीवरचं हे मंदा शिखर आमच्या कल्पनेपेक्षा खूपच भव्य आणि अवघड निघालं होतं. मी, अविनाश फौजदार, जगदीश चाफेकर, संजय डोईफोडे, जितेंद्...