पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लॉकडाऊनमधले शिक्षणप्रयोग ; तुषार कलबुर्गी

इमेज
अनुभव सप्टेंबर २०२१च्या अंकातून  कोव्हिडकाळात शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला ; पण तो सगळ्यांनाच परवडणारा नाही . कोणाकडे स्मार्टफोन नाही , तर कोणाकडे स्मार्टफोन रिचार्ज करायला पैसे नाहीत . या दोन्ही गोष्टी असल्या तर घरी फोन एक आणि मुलं त्याहून जास्त . लॉकडाऊनमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागलेली असताना ऑनलाइन शिक्षणासाठी पैसा खर्च करणं कसं परवडणार ? मुलं शाळेत येऊ शकत नसतील तर शिक्षकांनी मुलांपर्यंत जायला हवं असा विचार करून पुण्यातील शिक्षक अमर पोळ यांनी नवा प्रयोग सुरू केला . शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या प्रयत्नांवर टाकलेला प्रकाश . आकाश यादव हा पुण्याच्या गुलटेकडीमधील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये राहणारा आठवीतला मुलगा . सातवीपर्यंत जवळच्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकला . आई - वडील दोघंही भाजी विक्री करतात . त्यातून त्यांचं घर चालतं . आकाशकडे त्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नाही . मुलाच्या शिक्षणासाठी मोबाईल घेऊ शकतील आणि दर महिन्याला दोनशे रुपयांचं रिचार्ज करू शकतील , अशी त्याच्या घरची परिस्थिती नाही . रोशनी , खुशी आणि मोहित हे तिघं भाऊ - बहीणही मीनाताई ठाकरे

एक दुःख तुझे पोरी मला त्याची व्यथा : अनिल साबळे

इमेज
अनुभव दिवाळी २०१९च्या अंकातून जुन्नर-ओतूर परिसरातला पेटलेला उन्हाळा.  ‘मध घ्या, मध’ असा एका लहान मुलीचा आवाज कानावर आला. मी बाहेर येऊन बघितलं, तर हातात परात घेतलेली अंदाजे दहा वर्षांची मुलगी आणि दारू पिऊन झिंगलेली तिची आई नुकत्याच काढलेल्या मोहळांचा मध विकत होत्या. दोघी कातकरी समाजाच्या दिसत होत्या.  ओतूर गावालगत अगदी नदीच्या काठावर एक गरीब कातकरी वस्ती आहे. माझ्या मित्रांमार्फत पुण्यातून गोळा झालेले कपडे, चपला इत्यादी वस्तू देण्यासाठी मी नेहमी त्या वस्तीवर जात असतो. ही माणसं तिथे साधी कुडाची घरं बांधून राहतात. चिंचेच्या मोसमात कातकरी नवरा-बायको जोडीला दिवसभर चिंचा झोडण्याचं काम मिळतं. नवर्‍याने झाडावर चढून चिंचा झोडायच्या आणि बायकोने त्या चिंचा पोत्यात भरून ठेवायच्या. उन्हाळयात हातात झेलं घेऊन रानातले आंबे उतरुन काढण्याचं काम असतं. चिंचा आणि आंब्यांची ही दोन जोखमीची कामं सोडली तर या माणसांना कायमस्वरुपी रोजगार नसतो. त्यामुळे घरांमध्ये दोन वेळच्या जेवणाचीही मारामार. नदीच्या पाण्यात मिळतील ते मासे-खेकडे पकडून भाजून नाहीतर कालवण करून खायचे, याचाच त्यांना आधार.   त्या मायलेकींनी घाणेरीच्य

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

इमेज
अनुभव दिवाळी २०२० च्या अंकातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यशैली आणि संघाच्या स्वयंसेवकांचं विचारविश्व हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. संघाच्या स्थानिक वर्तुळात चार दशकं डोळसपणे वावरलेल्या एका सजग व्यक्तीला मागे वळून पाहताना या दोहोंबद्दल काय वाटतं ?   बा हेर धो धो पाऊस पडत आहे. दाटून आलेली संध्याकाळ आणखीच दाटून आली आहे असं वाटून राहिलं आहे. मला उशीर झाला आहे... अर्धामुर्धा भिजलेला मी पेंडशांच्या वाड्यात वरच्या हॉलमध्ये जाणारे लाकडी जिने धडधड चढतो. हॉलमधून येणारा पद्याचा आवाज क्रमश: मोठा होत जातो, त्याच क्रमाने मला उशीर झाल्यामुळे आलेलं ओशाळेपण हलकंसं वाढत जातं... दारात चपलांच्या रांगा लागलेल्या आहेत. भिजलेल्या छत्र्यांसाठी बादली ठेवलेली आहे. राज भागवत चपलांच्या रांगांपाशी उभा आहे. मी चपला ओळीत काढतो की नाही यावर त्याचं लक्ष आहे. त्याच्याकडे मी पाहत नाही, पण त्याच्या नजरेचं मला भान आहे... मी चपला बरोबर काढतो. आत शिरताना त्याची-माझी नजरानजर होते. त्याचा चेहरा तसाच गंभीर राहतो... तो हेच काम आणखी किती वर्षं करणार, असं मला क्षणभर वाटून जातं... मी हॉलमध्ये शिरतो. पद्याचं दुसरं कडवं सं

अवलिये आप्त : सुहास कुलकर्णी

इमेज
जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेल्या काही धुनी आणि अवलिया माणसांबद्दल सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘ अवलिये आप्त ’ हे पुस्तक लवकरच ‘ समकालीन प्रकाशना ’ तर्फे प्रकाशित होतंय . ही आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक - सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी , अव्वल आणि अस्सल माणसं .  या पुस्तकाचं हे मनोगत . आपल्याला माणसं काय आयुष्यभर भेटतच असतात . त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो . त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात . काहींशी नात्यांचे धागे विणले जातात . काहींशी दोस्तीही होते . ही माणसं आपली असतात . अर्थातच , सगळी माणसं सारखी नसतात . कुणी विद्वान असतात , कुणी प्रतिभावान असतात . कुणी लोकसेवक असतात , कुणी जागले असतात . कुणी बोलके असतात , कुणी अबोल . कुणी लोकांमध्ये वावरत असतात , कुणी गुहेत आपल्या कामात गर्क . माणसं कशीही असोत , पण त्यांच्यात एक अवलियापण असतं . त्यांच्यात एक प्रकारची धुंदी असते . त्यांच्यातील हे धुनीपण त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवत असतं . तेच त्यांना कार्यप्रवृत्त करत असतं . आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाले किंवा वयोमानाने अगदी शरीरही थकलं ,