पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भटकंती प्राचीन घाटमार्गाची : प्रणव पाटील

इमेज
भटकंती प्राचीन घाटमार्गाची : प्रणव पाटील अनुभव मार्च २०२२ प्राचीन काळी सह्याद्रीच्या डोंगररांगातील घाटांमधून अनेक व्यापारी मार्ग कोकणातील कल्याण, सोपारा, चौल या बंदरांकडे जात. पुढे इतर अनेक रस्ते तयार होत गेले, तसे हे डोंगरांमधले घाटमार्ग विस्मृतीत गेले. कुसूर घाट हा सह्याद्रीतला असाच एक प्राचीन व्यापारी मार्ग. या घाटात फेरफटका मारून तो मार्ग आणि तिथल्या पठारावर राहणार्‍या माणसांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न. कार्ले लेणी ज्या डोंगरात आहेत, त्याच्या उत्तरेला आंध्रा नदीचं खोरं आहे. त्यावरून या भागाला आंदर मावळ असं म्हटलं जातं. पुण्याहून जुन्या महामार्गाने लोणावळ्याला जाऊ लागलं की उजव्या हाताला कान्हे गाव आहे. या गावातून टाकवे गावाकडे जाणार्‍या रस्त्याने पुढे गेल्यास आंध्रा नदीवर टाटांनी बांधलेलं ठोकळवाडी धरण दिसतं. या धरणाच्या कडेने जाणार्‍या रस्त्यावर माउ नावाचं लहानसं वड्या-वस्त्यांचं गाव आहे. या गावाजवळच्या मोरमारे वाडीतून मागच्या डोंगरावर पक्का रस्ता गेलेला दिसतो. या रस्त्याने डोंगर घाटातली वळणं घेत आपण डोंगरवाडीत पोहोचतो. डोंगरवाडी ही महादेव कोळी लोकांची लहानशी वाडी आहे. वाडीत काही

सलाम कट्टा साधतोय कष्टकऱ्यांशी थेट संवाद : टीम सलाम पुणे

इमेज
सलाम कट्टा साधतोय कष्टकऱ्यांशी थेट संवाद : टीम सलाम पुणे  अनुभव मार्च २०२२ पुण्याच्या वस्त्यांमधल्या कष्टकरी माणसांसाठी हक्काचं एक व्यासपीठ असावं,  यासाठी ‘सलाम पुणे’ अंक सुरू झाला. वस्तीतल्या लोकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी सलाम कट्ट्याचं आयोजन केलं जात. त्याबद्दल.. पुण्याच्या वस्त्यांमधल्या कष्टकरी माणसांसाठी हक्काचं एक व्यासपीठ असावं, त्यांच्या उपयोगाचा मजकूर त्यांना वाचायला मिळावा, राहणीमान सुधारण्याच्या धडपडीत त्यांना मदत मिळावी या हेतूने ‘सलाम पुणे’ हा अंक मितानिन फाउंडेशनमार्फत  सुरू झाला. ‘सलाम’चे अंक शहरातल्या वेगवेगळ्या वस्त्यांमधल्या १५ हजार वाचकांपर्यंत पोहोचत आहेत.    ‘सलाम पुणे’ चा पहिला-दुसरा अंक आम्ही वस्त्यांमध्ये घराघरांत जाऊन पोहोचवत होतो. विशेषतः तरुण मुला-मुलींना या अंकाबद्दल खूप उत्सकता वाटायची. धडपड्या लोकांच्या यशकथा तर त्यांना आवडायच्याच, पण त्याबरोबर ‘सल्ला मार्गदर्शन’ हा विभाग वाचण्यातही त्यांना रस असायचा. वस्त्यांमधला सर्वांत जिव्हाळ्याचा प्रश्‍न म्हणजे तरुणांना नोकरी-धंदा कसा मिळेल? ‘रोजगार सल्ला देताय ते खूप चांगलं आहे, पण फक्त माहिती वाचून नोकरी मि

मुक्काम वाराणसी : योगेश जगताप | स्नेहल मुथा

इमेज
मुक्काम वाराणसी : योगेश जगताप | स्नेहल मुथा अनुभव मार्च २०२२ काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिर परिसराचा कायापालट करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे वाराणसी चर्चेत आहे. शिवाय सध्या तिथे निवडणुकांची रणधुमाळीही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम’च्या विद्यार्थ्यांनी या शहराला भेट दिली. त्या मुक्कामात त्यांनी अनुभवलेल्या वाराणसीची ही झलक. दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी याच्या वीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘इंद्रा द टायगर’ या सुपरहिट सिनेमाने मी झपाटून गेलो होतो. एवढा की दिवसातून तीनतीनदा तो सिनेमा बघायचो. सिनेमा दाक्षिणात्य असला तरी त्याला कशी कोण जाणे, वाराणसी शहराची पार्श्वभूमी होती. त्या सिनेमामुळे पहिल्यांदा वाराणसीशी नातं जुळलं. या शहरात जायला हवं, अशी ठिणगी मनात पडली ती तेव्हाच. पुढे आणखी एका दाक्षिणात्य नटाच्या सिनेमामुळे, धनुषच्या ‘रांझणा’मुळे मी वाराणसीकडे ओढला गेलो. या सिनेमातून पाहिलेला वाराणसीचा परिसर, तिथल्या गल्ल्यागल्ल्यांमधली मंदिरं, गंगेवरचे घाट यांनी कायमचं मनात घर केलं. पण तरीही वाराणसीला येण्याचं निमित्त मिळत नव्हतं. ती संधी मिळाली उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमुळ