Posts

ऑक्टोबर २०२० - अनुक्रमणिका

  लेख धाकल्या भावंडांसमोरचा आर्थिक पेच : मंगेश सोमण   आरोग्य योजनांचं ‘ गरीब ’ वास्तव : प्रशांत खुंटे   हवामानामुळे बदलतोय माणूसही : निरंजन घाटे  टिळक - गांधी : नेतृत्वाची सांधेजोड : नरेन्द्र चपळगावकर  निर्वासित मुलांना रिझवणारे ‘ जोईज ’ : प्रीति छत्रे     माणसं आमटे वृक्षाच्या छायेत : सुहास कुलकर्णी    निमित्त कोव्हिड लॉकडाऊन विस्थापन : आणखी काही अनुभव : सायली तामणे   लॉकडाऊनच्या पत्रकारी नोंदी : शेखर देशमुख     ललित कोरोनाकथा : मुकेश माचकर   हार : अझहर अबरार , अनुवाद : सुकुमार शिदोरे    थोडक्यात महत्त्वाचं स्वतःपलीकडे : वृषाली जोगळेकर   

धाकल्या भावंडांसमोरचा आर्थिक पेच - मंगेश सोमण

Image
    कोव्हिडच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या राज्यं मेटाकुटीला आली आहेत. कोव्हिड नियंत्रणासाठी होणरा मोठा खर्च आणि लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेला बसलेली खीळ या दोन्हीच्या जोडीला केंद्राकडून जीएसटी भरपाई होत नसल्याने केंद्राची धाकली भावंडं असलेल्या राज्यांपुढे आर्थिक पेच निर्माण झालाय. या पेचामागची नेमकी कारणं काय आहेत याची चर्चा करणारा लेख. आर्थिक संबंधांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतीय संघराज्यात केंद्र सरकार मोठ्या भावाच्या आणि राज्य सरकारं धाकट्या भावाच्या भूमिकेत मानता येतील. केंद्र सरकारकडे करमहसूल गोळा करण्याचे जास्त अधिकार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नेमणुका केंद्र सरकार करतं. केंद्र सरकारच्या कर्जाला रोखे बाजारातील मंडळी निखळ , जोखीमविरहित सार्वभौम कर्ज मानतात. राज्य सरकारांना मात्र कर्जउभारणी करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत केंद्र सरकारची बाजू अशी वरचढ असली तरी राज्य सरकारांवर कायदा सुव्यवस्था राखण्याची आणि आरोग्य-शिक्षणासह इतर अनेक महत्त्वाच्या सोयी जनतेला पुरवण्याची प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे ढोबळमानाने पाहिलं तर देशातील एकूण सरकारी खर

कोरोना कथा - मुकेश माचकर

Image
  राजा को रानी से प्यार हो गया तिचं नाव राणी नव्हतं . त्याचंही नाव राजा नव्हतं . लॉकडाऊन उठवला जाऊ लागला , त्या काळात त्यांची पहिली भेट झाली होती . मुंबईच्या एका उपनगरातल्या रेल्वे स्टेशनावरच्या , पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडणाऱ्या  पादचारी पुलावर . दोन्ही डोळ्यांत फुलं पडलेली , स्क्रू थोडा ढिला असलेली गलिच्छ कपड्यांमधली हडकलेली अधू डोळ्यांची भिकारीण होती ती . त्या पुलावर रोज भीक मागणारी . कोरोनामुळे लॉकडाऊन लागलाय हे तिला कळलं ‘ तिचा पूल ’ दोन्ही बाजूंनी अडसर लावून बंद करण्यात आला तेव्हा . ती रोज पुलापाशी यायची , अडसर चाचपायची आणि हे कृत्य करणा ऱ्यां ना शिव्याशाप देत उपनगराच्या अंधार् ‍ या सांदीकोपर् ‍ यांत परतायची . एक दिवस अडसर निघाले आणि ती पुन्हा तिच्या हक्काच्या जागेवर विराजमान झाली . रेल्वे सुरू झाली नव्हती , पुलावरून माणसांची ये - जा फारशी नव्हती . तिला भीकही फारशी मिळत नव्हती , पण हक्काची जागा परत मिळाल्याचा आनंद होता . त्याच काळात पुलावर काही गांजेकस पोरांचा मुक्काम पडला . अचकट - पाचकट बोलत चिलमीच्या कडक धुराचे झुरके मारत बसलेल्या या पोरांपैकी एकाला एकदा तहान ला

आरोग्य योजनांचं ‘गरीब’ वास्तव - प्रशांत खुंटे

Image
  गरिबांना मोफत उपचार देऊ करणाऱ्या  सरकारी आरोग्य योजना कागदोपत्री चांगल्या असतात . मात्र त्यांची अंमलबजावणी तितकीच प्रभावी असते का ? गरिबांना त्याबद्दल कितीशी माहिती असते ? कोव्हिडकाळात हे प्रश्न नव्याने ‘ आ ’ वासून समोर उभे राहिले आहेत . या योजनांचे काही अनुभव . “ मला पिशवीचा त्रास आहे . तीन वर्षं झाली . अंगावरून जातंय .” हॉस्पिटलच्या बेडवर बसून मीना गवारे ( वय ३८ ) सांगत होत्या . “ वज्जं उचलू उचलू पिशवी खाली सरकली . पाण्याच्या हांड्यांचं , सरपणाचं , रानातून गोळा केलेल्या हिरड्याचं वज्जं . रोज वज्जंच वहायचं . पण सांगणार कुणाला ?” ओझं उचलून मीनाताईंना आजार जडला . उपचारांचा खर्च करण्याची ऐपत नसण्याचंही एक ओझं त्यांच्या मनावर होतं . मीनाताईंसारख्या गरीबांच्या डोक्यावरील औषधोपचारांचा बोजा उतरवण्यासाठी शासनातर्फे काही योजना राबवल्या जातात . या वर्गघटकांचा या योजनांबद्दलचा अनुभव काय आहे ? मीनाताई आंबेगाव तालुक्यातील पिंपरगणे गावच्या . याच तालुक्यातील पारूबाईंनाही ( वय ५० ) गर्भाशयाचा आजार आहे . त्यांनीही आपल्या त्रासाची कोणाकडे वाच्यता केली नव्हती . हीच गत विठाबाई सोनवणेंची . त्या

हवामानासोबत बदलतोय माणूसही - निरंजन घाटे

Image
  हवामानबदलाची चर्चा करताना मानवाच्या उत्क्रांतीवर आणि वर्तणुकीवर झालेल्या परिणामांना दुर्लक्षून चालत नाही. जगभरात यासंदर्भात बरंच संशोधन झालं आहे , अजूनही सुरू आहे. त्याचा हा आढावा. हवामान बदलाचा मानवी वर्तणुकीवर परिणाम होतो , हे वर्तणूक शास्त्रज्ञांनी वेळोवेळी सांगितलं आहे. जागतिक हवामानबदलाचा तर मानवी वर्तणुकीवर निश्चितच परिणाम होईल , असंही ते म्हणतात. सध्या हवामान बदलाचा मुद्दा पुढे येतो , तेव्हा वाढणारं सरासरी तापमान हा त्यातला कळीचा मुद्दा असतो. त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे मानवी उत्क्रांतीवर होणारा परिणाम. ही शक्यता देखील बर्‍याच वर्तणूक शास्त्रज्ञांनी पडताळून पाहिली आहे. इतर प्राण्यांची शरीरं आणि त्यांच्या डोक्याची व्याप्ती यांच्या प्रमाणापेक्षा नैसर्गिकरीत्या मानवी डोक्याची व्याप्ती मोठी असते. कारण मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या शारीरिक तुलनेत बर्‍यापैकी मोठा असतो. मेंदू मोठा असल्यामुळेच आपण अमूर्त विचार करू शकतो , बोलू शकतो आणि भविष्याचा अंदाज घेण्यासाठी इतिहासाची मदत घेतो. आपल्या बर्‍याच जाणिवा इतर प्राण्यांपेक्षा तीव्र असतात. त्यामुळे आपण कसे वागतो हे