पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोण आहेत एक्स, वाय, झेडवाले मनसबदार? : आनंद अवधानी

इमेज
कोण आहेत  एक्स, वाय, झेडवाले मनसबदार? : आनंद अवधानी  भारतामध्ये सरंजामशाही होती तेंव्हा राजे, अष्टप्रधानमंडळ, मनसबदार, शिपाई असे नाना प्रकार असत. या मनसबदारांचे पंचवीस हजारी, वीस हजारी, दहा हजारी, पाच हजारी असे तऱ्हेतऱ्हेचे स्तरही असत. म्हणजे त्या त्या मनसबदाराला त्याच्या किताबाप्रमाणे कमी जास्त रक्षक-अंगरक्षक मिळत असत. आज एकविसाव्या शतकामध्येही असे अनेक (भेदरलेले) मनसबदार तुमच्या आमच्यामध्ये वावरताना दिसतात. जे सरकारच्या म्हणजे पर्यायानं तुमच्या आमच्या खर्चानं आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षा रक्षकांच्या कोंडाळ्यामधून फिरत असतात. आजच्या मनसबदारीचे एक्स, वाय, झेड आणि झेड प्लस असे चार प्रकार आहेत. ज्याला भीती अधिक त्याला तितकी भारी मनसबदारी असा इथला अजब न्याय आहे. राजकारणात अगदी किरकोळ पद असलं आणि सरकारात बरी ओळखपाळख असली की त्या माणसाला 'एक्स' सुरक्षाव्यवस्था मिळू शकते. फक्त त्यानं मला धमकीचा फोन आला असं एकदा ओरडायची खोटी! त्याच्या तैनातीसाठी, अगदी चोवीस तास त्याच्या मागेपुढे रहाण्यासाठी सहा पिस्तुलधारी अधिकारी दिले जातात. हे अगदी तालुक्यातल्या मनसबदारालाही सहज जमून जातं. त्याहून मो

दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी

इमेज
दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी अनुभव दिवाळी २०२०च्या अंकातून ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचं आज निधन झालं. समकालीन प्रकाशन आणि युनिक  फीचर्सशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. समकालीनचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी  त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या अवलिये आप्त या पुस्तकात तो समाविष्ट  केलेला आहे. काही माणसं खूप आधीपासून आपल्या आयुष्याचा भाग असतात , पण प्रत्यक्ष आयुष्यात बर्‍याच नंतर भेटतात. अनिल अवचट यांच्या बाबतीत माझं असंच झालं. शाळा-कॉलेजमध्ये असताना जी पहिली लक्षात राहतील अशी पुस्तकं वाचली , त्यात अवचटांची पुस्तकं होती. या अर्थाने अवचट आयुष्यात आले ते वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी. लेखक म्हणून. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद सुरू होण्यासाठी त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षं जावी लागली. पण जेव्हा त्यांची भेट झाली , त्यानंतर हा आवडता लेखक मित्रच बनून गेला. पूर्णिया , वेध , छेद , संभ्रम , कोंडमारा , धागे आडवे उभे , धार्मिक , माणसं , वाघ्या-मुरळी , प्रश्न आणि प्रश्न अशी पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे , याची