पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठीचे मारेकरी कोण ? : सुहास कुलकर्णी

इमेज
मराठीचे मारेकरी कोण ? : सुहास कुलकर्णी पुण्या-मुंबईत कोणतीही दोन माणसं एकत्र भेटली, की गप्पांमध्ये त्यांचं एका विषयावर एकमत असतं. इंग्रजी-हिंदीचं आक्रमण पाहता मराठी भाषेचं काही खरं नाही, असं त्यांना वाटत असतं. मराठी भाषा टिकेल का असा प्रश्न त्यांच्या मनात उमटत असतो आणि मराठीचा र्‍हास होणार याविषयी खात्री असते. आपली भाषा धोक्यात आहे या जाणीवेने असे लोक अस्वस्थ होतात नि मराठी वाचवायच्या मागे लागतात. इंग्रजी-हिंदी या भाषांमुळे मराठीची पीछेहाट होते आहे, असं अनेकांना वाटत असल्यामुळे एकमेकांशी नि परभाषिकांशी मराठीत बोलून किंवा दुकानांच्या पाट्या मराठीत लावून मराठी टिकेल असं त्यांना वाटून जातं. पुण्याची हवा गेले काही दिवस बदलली आहे. ट्रॅफिक जॅम, चिंचोळे रस्ते, रिक्षावाल्यांची अरेरावी, पीएमटीची अवस्था, फ्लॅटसच्या वाढत्या किमती, महागडं होत चाललेलं शिक्षण, राजकारणातला भंपकपणा, क्रिकेटमधलं फिक्सिंग असे सर्व विषय पुण्याच्या हवेतून गायब झाले आहेत. सध्या ज्याच्यात्याच्या तोंडी 'मराठी पाट्यां'चा विषय आहे. मराठी पाट्यांवर सर्वत्र एवढी चर्चा आहे की, त्यातून पुणेकरांना मराठी भाषेच्या भवितव्याची

ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे : सुहास कुलकर्णी

इमेज
ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे :  सुहास कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे यांचा आज पहिला स्मृतिदिन. डुम्बरे यांचं व्यक्तिमत्त्व आणि पत्रकारितेतील त्यांचं योगदान उलगडून दाखवणारा युनिक फीचर्सचे संपादक सुहास कुलकर्णी यांचा लेख.   कोरोनाच्या महालाटेत जी माणसं अचानक हे जग सोडून गेली, त्यातले एक सदा डुम्बरे. खरं पाहता त्यांची तब्येत उत्तम होती, ते आरोग्याची नीट काळजीही घेत, रोज घाम निघेपर्यंत भरपूर चालत. खाणंपिणंही अगदी संयमित. पण तरीही कोव्हिडने त्यांच्यावर मात केली आणि पृथ्वीवरील एक भला माणूस कमी झाला. दोनच वर्षांपूर्वी डुम्बरेंनी वयाची सत्तरी गाठली होती आणि त्यांच्या मित्रांनी एका छोटेखानी समारंभात त्यांचं कौतुक वगैरे केलं होतं. अर्थात, डुम्बरेंमधे उत्साह, उर्जा आणि चैतन्य इतकं काठोकाठ भरलेलं होतं, की वयाच्या या आकड्याचा नि त्यांच्या वागण्या-बोलण्याचा जवळपास काही संबंध नव्हता. कारण ते जसे चाळिशीत होते, तसेच त्याही दिवशी होते. उमदे, उत्साही आणि मनमोकळे. वयासोबत माणूस अधिकाधिक स्थिर आणि प्रगल्भ होत जातो असं म्हटलं जातं. पण मी बघतोय तेव्हापासून डुम्बरे विचारांनी स्थिर आणि बुद्धीने प्रगल्भच ह