पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेती सुधारणांची निरगाठ : मंगेश सोमण

इमेज
अनुभव जानेवारी २०२१च्या अंकातून, केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात दोन परस्परविरोधी मतं सध्या आपल्यासमोर आहेत. हे कायदे म्हणजे शेती बड्या उद्योगांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं  दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. हे तिन्ही कायदे रद्द केले जावेत , अशी त्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे , हे कायदेच शेतकर्‍यांना आजवरच्या बंधनातून मुक्त करणार असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. शेती सुधारणांचं वास्तव मात्र याहून अधिक गुंतागुंतीचं आहे.   शेती कायद्यांच्या निमित्ताने भारतीय शेती क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांच्या आणि आकडेवारीच्या खोलात उतरल्यावर लक्षात येतं , की या मुद्द्यांवर ठोस आणि काळी-पांढरी विधानं करणं अतिशय अवघड आहे. याचं मुख्य कारण ‘भारतीय शेती क्षेत्र’ या संज्ञेत सामावलेली प्रचंड विविधता आणि वेगवेगळे संदर्भ. शेती आणि शेतकरी यांची चर्चा करताना आपण नक्की कुणाबद्दल बोलतोय आणि कुठल्या संदर्भात बोलतोय याची स्पष्टता नसेल तर वेगवेगळी आणि परस्परविरोधी विधानंही आपापल्या जागी खरी असू शकतात. भारतीय शेतीतल्या विविधतेचा पैस दाखवणारी ही काही उदाहरणं पाहा.

निर्वासितांचे सहोदर : प्रीति छत्रे

इमेज
   अनुभव जुलै २०२१च्या अंकातून , युरोपासमोर निर्वासितांच्या लोंढ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. जनमत निर्वासितांविरोधात तयार होत असताना या समस्येचा मानवी चेहरा समोर आणण्याचं काम काही पत्रकार , आणि वृत्त छायाचित्रकार चिकाटीने करत आले आहेत. निर्वासितांच्या या सहोदरांबद्दल..   “ माय मिशन इज टू मेक शुअर दॅट नोबडी कॅन से: ‘आय डिडन्ट नो’ , माय मिशन इज टू टेल यू द स्टोरी अँड देन यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू.” - यान्निस बेहराकिस , वृत्त छायाचित्रकार   ग्रीस-नॉर्थ मॅसेडोनिया सीमेलगतच्या इडोमेनी गावाजवळ घेतलेला हा फोटो. ओस पडलेला रस्ता , पाऊस , धुकं. एक सिरियन निर्वासित आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन निघाला आहे. त्याच्याजवळ बाकी काहीही सामान नाही. सोबत आणखी कुणीही नाही. घर मागे राहिलेलं. पुढे काय वाढून ठेवलंय माहिती नाही. आगापिछा नसलेलं त्यांचं अस्तित्व , पण दोघांनाही एकमेकांचा केवढा आधार आहे हे फोटोतून नेमकं कळतं. यान्निस बेहराकिस या ग्रीक वृत्त छायाचित्रकाराचा हा गाजलेला फोटो आहे. अरब स्प्रिंगनंतर सिरिया , ट्युनिशिया इत्यादी देशांमध्ये काय घडलं , निर्वासितांचे लोंढे युरोपकडे कसे निघाले ,