पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी

इमेज
 दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज जन्मदिन. समकालीनचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या अवलिये आप्त या पुस्तकात तो समाविष्ट केलेला आहे.  काही माणसं खूप आधीपासून आपल्या आयुष्याचा भाग असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात बर्‍याच नंतर भेटतात. अनिल अवचट यांच्या बाबतीत माझं असंच झालं. शाळा-कॉलेजमध्ये असताना जी पहिली लक्षात राहतील अशी पुस्तकं वाचली, त्यात अवचटांची पुस्तकं होती. या अर्थाने अवचट आयुष्यात आले ते वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी. लेखक म्हणून. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद सुरू होण्यासाठी त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षं जावी लागली. पण जेव्हा त्यांची भेट झाली, त्यानंतर हा आवडता लेखक मित्रच बनून गेला. पूर्णिया, वेध, छेद, संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे उभे, धार्मिक, माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न अशी पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे, याची जाणीव या पुस्तकांनी करून दिली होती. आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळाली होती. त्यामुळे या सर
इमेज
फुलेल तेव्हा बघू लेखक :  विनोदकुमार शुक्ल भाषांतर : निशिकांत ठकार                                    अनुभव ऑगस्ट २०२२   हिंदीतील ज्येष्ठ प्रयोगशील लेखक विनोदकुमार शुक्ल यांच्या 'खिलेगा तो देखेंगे' या कादंबरीचं निशिकांत ठकार यांनी केलेलं भाषांतर नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उलगडणाऱ्या या कादंबरीतील एक भाग. खास अनुभवच्या वाचकांसाठी. तळ्याच्या वरच्या अंधारात आणि  पाण्याच्या आतल्या अंधारात काही विशेष फरक नसावा. त्यामुळे  माशांना वरचा अंधारही पाणी वाटत  असेल. पाण्यातल्या अंधारात पाणी होतं, जमिनीवरच्या अंधारात पाणी नव्हतं. फुलझाडाचं एखादं रोप लावून फूल फुलेल तेव्हा पाहू, असं म्हणून घरातले सगळेजण आपापली कामं सोडून त्यासमोर बसून राहत नाहीत. हे तर महिन्या दोन महिन्यांच्या भविष्यानंतर कळणार. वर्षांच्या भविष्याची तर अशी गोष्ट होती, की आंब्याची झाडं लावून बरेच दिवस जिवंत राहून लोक मरूनही जात. मरण्याच्या काही वर्षं आधी वाटायचं की आपण लावलेले आंबे खायला मिळतील. शेवटी आंबे न खाताच मरून जायचे. तळ्याच्या काठाकाठाने आंब्याची मोठमोठी झाडं होती.