पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
टेनिस क्रिकेटचं अज्ञात विश्व: तुषार कलबुर्गी क्रिकेटच्या मुख्य धारेत प्रवेश मिळू न शकलेल्यांनी गेल्या काही वर्षांत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. व्यवस्थेविरुद्ध जणू बंड पुकारत उभारलेल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अज्ञात, पण थरारक विश्वाचा फेरफटका. भारतातली बहुतेक मुलं लहानपणापासून क्रिकेट खेळतात. ज्यांच्यात विशेष कौशल्य असतं, ती कधी ना कधी भारताकडून खेळायचं असं स्वप्न बाळगून असतात. पण साऱ्यांचीच स्वप्नं पुरी होत नाहीत. मग अंगात हुनर अन्‌‍ खेळण्याची जिगर असलेले हे खेळाडू काय करतात? क्रिकेटच्या मुख्य धारेत प्रवेश मिळू न शकलेल्यांनी गेल्या काही वर्षांत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. व्यवस्थेविरुद्ध जणू बंड पुकारत उभारलेल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अज्ञात, पण थरारक विश्वाचा फेरफटका.  दोन मातब्बर संघांचा क्रिकेट सामना सुरू आहे. 30-35 हजार प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरलंय. सामना रात्रीचा असल्यामुळे चारही बाजूंनी दिव्यांचा झगमगाट आहे. सामना एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. स