पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुभव ऑगस्ट २०१८

इमेज

जगण्याचे आर्त असेही.. - आनंद अवधानी । अनुभव दिवाळी २०११

इमेज
स्वतःची ओळख, भोवतालाचं भान हरवून बसलेले, गलिच्छ आणि लाजिरवाणं जीणं जगणारे रस्त्यावरचे मनोरुग्ण. सार्‍या जाणीवाच शून्य झालेल्या या माणसांकडे समाजही भावनाशून्यपणेच पाहात असतो. अशा मनोरुग्णांना पुन्हा ‘माणसात’ आणण्याचा एक जाणता प्रयत्न डॉ. भरत व डॉ. स्मिता वाटवानी हे मनोविकारतज्ज्ञ दांपत्य करत आहे. कर्जतजवळ ‘श्रद्धा’ ही संस्था उभी करून मानसिक रुग्णांवर उपचारापासून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवण्यासाठी चालवलेल्या अथक कार्याचा, आपल्या संवेदनांना साद घालणारा परिचय.  

दारूचं मृत्युतांडव - हेरंब कुलकर्णी । अनुभव जुलै २०१८

इमेज
शहरी भागातील अनेकांना दारूबंदी हा व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडलेला मुद्दा वाटतो; पण गरीब कुटुंबांमध्ये दारू किती थैमान घालते याची त्यांना क्वचितच कल्पना असते. ग्रामीण भागात फिरताना दारूचं हे मृत्युतांडव पदोपदी सामोरं येतं आणि आपल्याला सुन्न करून जातं.

नैननची (चित्र)भाषा - मुकेश माचकर । अनुभव जुलै २०१८

इमेज
• नीतीश कुमारांनी बिहारमध्ये दारूबंदी जाहीर केली तेव्हाची गोष्ट. अजित नैनन (उच्चारी नायनन) यांनी या निर्णयावर भाष्य करणारं व्यंगचित्र तयार केलं आणि संपादक मंडळाकडे पाठवून दिलं. नैनन यांनी या व्यंगचित्रात एका पालखीसारख्या उच्चासनात बसून दारूच्या बाटल्या इतस्ततः फेकणारे नितीश कुमार चित्रित केले होते. ते पाहणारा एक माणूस दुसर्‍याला सांगत होता, ‘ही इज ड्रंक ऑन पॉवर...’ (यांना सत्तेची नशा चढली आहे).

१२७ तासांची झुंज - गौरी कानेटकर । अनुभव जुलै २०१८

इमेज
  अ‍ॅरन रॅल्स्टन हा भटका गिरिप्रेमी एके दिवशी कल्पनातीत संकटात सापडतो आणि त्याच्यासमोर उभे ठाकतात काही जीवघेणे प्रश्‍न. अमेरिकेतल्या एका कॅनियनच्या घळीत १२७ तासांची एकाकी झुंज देत मृत्यूला भेटून आलेल्या अ‍ॅरनची गोष्ट ऐका-वाचायलाही हिंमत हवी.

भारतीय मुसलमानांचे प्रश्न : भवितव्याचे, अस्तित्वाचे - अब्दुल कादर मुकादम । अनुभव जुलै २०१८

  भारतीय मुस्लिमांच्या सद्य:स्थितीबद्दलची मतं मांडणारे अनेक अभ्यासक-विश्‍लेषकांचे लेख गेल्या महिन्यात इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झाले होते. तशीच चर्चा मराठीमध्येही व्हावी, या हेतूने ‘अनुभव’ने मुस्लिम समाजासोबत काम करणारे अभ्यासक कार्यकर्ते हुमायून मुरसल आणि शमसुद्दीन तांबोळी यांचे लेख गेल्या अंकांमध्ये प्रकाशित केले होते. त्यावर प्रतिक्रिया मांडणारा आणि मुस्लिम प्रश्‍नांबाबत ऊहापोह करणारा हा लेख. या लेखावरील विषयाला धरून असलेल्या लेखरूपी प्रतिक्रियांचं स्वागत आहे. 

अनुभव जुलै २०१८

इमेज
अनुभव जुलै २०१८ मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिका (मुखपृष्ठ चित्र - अन्वर हुसेन) अनुभव जुलै २०१८ मुखपृष्ठ अनुक्रमणिका • • • • • • • डेबिट/क्रेडिट कार्ड्स, नेटबँकिंगद्वारे अनुभवची वर्गणी भरा आता एका क्लिकवर - instamojo.com/anubhavmasik   • • • • • • • अनुभव जुलै २०१८ PDF अंक फक्त ₹30 मध्ये