पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज पहिला स्मृतिदिन. समकालीन प्रकाशन आणि युनिक फिचर्सचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या अवलिये आप्त या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. काही माणसं खूप आधीपासून आपल्या आयुष्याचा भाग असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात बर्‍याच नंतर भेटतात. अनिल अवचट यांच्या बाबतीत माझं असंच झालं. शाळा-कॉलेजमध्ये असताना जी पहिली लक्षात राहतील अशी पुस्तकं वाचली, त्यात अवचटांची पुस्तकं होती. या अर्थाने अवचट आयुष्यात आले ते वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी. लेखक म्हणून. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद सुरू होण्यासाठी त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षं जावी लागली. पण जेव्हा त्यांची भेट झाली, त्यानंतर हा आवडता लेखक मित्रच बनून गेला. पूर्णिया, वेध, छेद, संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे उभे, धार्मिक, माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न अशी पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे, याची जाणीव या पुस्तकांनी करून दिली होती. आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून