पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बघा, वाचा, विचार करा आणि मग मतं बनवा..

सध्या सर्वत्र फेक न्यूजचा प्रचंड सुळसुळाट आहे. व्हॉट्सॅप विद्यापीठामार्फत या फेक न्यूज राजरोसपणे फिरतात आणि वाचणारे भक्तिभावाने त्या वाचतात. जवाहरलाल नेहरू हे कसे मूळ मुस्लिम होते, अशा ऐतिहासिक फेकमाहितीपासून उत्तर प्रदेशात अतिप्रचंड सोन्याच्या खाणी सापडल्या इथपर्यंत मोठा आवाका या फेकबातम्यांनी व्यापलेला आहे. त्यातच डीपफेक नावाचं एक नवं प्रकरण आपल्याला गुमराह करण्यासाठी सज्ज झालंय. नेहरूंबाबतच्या पोस्ट्ससारखी माहिती धादांत खोटी आहेत, हे इतिहास जाणणार्‍या सूज्ञ लोकांना लगेचच कळत असेल, पण आज घडणार्‍या बातम्यांबाबत काय खरं, काय खोटं हे कसं ओळखायचं? सोशल मीडियामध्ये फेकन्यूज ओतण्याचं प्रमाण बघता या बातम्यांची शहानिशा करणारी माध्यमंही गेल्या काही काळात उभी राहिली आहेत. एनडीटीव्ही इंडियाचे संपादक रवीश कुमारपासून प्रतीक सिन्हा आणि टीमने सुरू केलेल्या अल्ट न्यूजपर्यंत अनेक जण हे काम करताहेत. बघा, वाचा, विचार करा आणि मग मतं बनवा..  https://www.thequint.com/news/webqoof https://www.altnews.in/ https://www.youtube.com/watch?v=VBt5bqnOS6E https://www.youtube.com/results?se