पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्तमानाच्या नोंदी : दोन पक्ष - - सुहास कुलकर्णी

इमेज
 वर्तमानाच्या नोंदी आसपास घडणाऱ्या घटना घडामोडींचा संदर्भ समजून सांगणारी टिपणं. दोन पक्ष काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे भारतातल्या सर्वाधिक जुन्या पक्षांपैकी पक्ष. काँग्रेसचं एकेकाळी देशभर वर्चस्व होतं, तर कम्युनिस्टांचं काही थोड्या राज्यांमध्ये. आज हे दोन्ही पक्ष पूर्णपणे गळफटले आहेत.  काँग्रेसचा विचार करता त्यांची परिस्थिती कम्युनिस्टांपेक्षा बरी आहे. देशभर या पक्षाचं अजूनही अस्तित्व आहे आणि संख्येने कमी का असेना, पण त्यांचे आमदार-खासदार निवडून येत आहेत. काही राज्यांमध्ये अजूनही ते प्रमुख पक्षाच्या भूमिकेत आहेत. पण कम्युनिस्ट मात्र केरळ वगळता देशभरातून जवळपास हद्दपार झालेले आहेत. बंगालात सलग पस्तीस वर्षं सत्ता गाजवून विक्रम केलेले कम्युनिस्ट तिथेही जवळपास नामशेष झालेले आहेत. एखादा पक्ष स्वत:ची सत्ता आणि प्रतिमा कशी घालवून बसू शकतो, याचं कम्युनिस्ट पक्ष हे उत्तम उदाहरण ठरावं.  एकेकाळी भारतातल्या कामगार चळवळीचं नेतृत्व करणारा आणि बिगर काँग्रेस-बिगर भाजप राजकारणाचा अध्वर्यू पक्ष आज निस्तेज आणि निष्प्रभ बनलेला आहे. स्वतंत्रपणे लढा किंवा आघाडी करून लढा, पक्षाची स्थिती दुरुस्त व्हायला तयार नाह