शेतकऱ्याचं जगणं कवितेतून मांडणारे ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचा आज जन्मदिवस. समकालीन प्रकाशनाचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या 'अवलिये आप्त' या पुस्तकात समाविष्ट केला आहे. ना. धों. महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ना. धों. महानोर कुणाला माहीत नाहीत? गेल्या शंभर वर्षांतील अव्वल मराठी कवींच्या प्रभावळीतील हे महत्त्वाचं नाव आहे. मर्ढेकरांना जसं मराठी नवकाव्याचं प्रवर्तक मानलं जातं, तसंच महानोर हे शेतकऱ्याचं जगणं कवितेतून मांडणारे पहिले कवी मानले जातात. पहिले, महत्त्वाचे आणि लोकप्रिय. पहिले, कारण महानोरांची कविता येईपर्यंत आपल्याकडे प्रामुख्याने शहरी कवींचाच पगडा होता. महानोर आपल्या कवितेत ग्रामीण आणि शेतकरी जगणं, झोपडी-पाडे, पीक-पाणी, गुरं-ढोरं, पांदीचे रस्ते नि पाणमळे, ऊन-पाऊस, नक्षत्रं-आभाळ-तारे, पशुपक्षी, पाखरांचे थवे, फुलं-पानं, बोरी-बाभळी असं स्वत:चं अख्खं शेतकरी जगच घेऊन आले. अशी कविता त्याआधी नव्हती. ते महत्त्वाचे कवी आहेत, कारण त्यांनी कवितेत निव्वळ निसर्ग आणला नाही. शेतकऱ्याचं जगणं, त्याच...
पोस्ट्स
सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे