अनुभव, जानेवारी २०२० - मुकेश माचकर यांचा कुणाल कामरा यावरील लेख
अनुभव, जानेवारी २०२० 'ब्र उच्चारणारी माणसं' अर्णब गोस्वामीसोबत झालेल्या वादामुळे सध्या कुणाल कामरा चर्चेत आहे. निव्वळ राजकीय व्यवस्थेलाच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील प्रस्थापितांना प्रश्न विचारण्याचं धाडस करणाऱ्या कुणाल कामरा याबद्दलचा हा लेख वाचा अनुभव जानेवारी २०२०च्या अंकात. कुणाल कामरा प्लीज डोन्ट शट अप या कुणाल ! कुणाल कामरा बारमध्ये शिरतो तेव्हा तीन माणसं त्याच्याकडे वळतात आणि म्हणतात, “जा, जा के पप्पू की चाट!” हा विनोद खुद्द कुणाल कामराच सांगतो- अनेकांना. त्याच्या शैलीत तो मिश्कील हसतही असणार हा विनोद सांगताना. त्याच्यावर असा विनोद का व्हावा? तो तर एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. त्याच्या शोजमध्ये तो साधारण तासभर लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर सहज सुचल्यासारख्या गप्पा मारत बोलतो, त्यात जबरदस्त पंचेस टाकतो. ते ऐकून लोक पोट धरधरून हसतात आणि फ्रेश होऊन बाहेर पडतात. आता हे काम करणाऱ्यावर सध्या विनोद का व्हावा? कारण तो, एका विशिष्ट वर्गाच्या भाषेत सांगायचं तर, देशद्रोही, हिंदुद्रोही, फेक्युलर, खांग्रेसी, लिबटार्ड आहे. म्हणजे इतकंच, की तो भारती