अनुभव, जानेवारी २०२० - मुकेश माचकर यांचा कुणाल कामरा यावरील लेख


अनुभव, जानेवारी २०२०


'ब्र उच्चारणारी माणसं'

अर्णब गोस्वामीसोबत झालेल्या वादामुळे सध्या कुणाल कामरा चर्चेत आहे.
निव्वळ राजकीय व्यवस्थेलाच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील प्रस्थापितांना प्रश्न विचारण्याचं धाडस करणाऱ्या कुणाल कामरा याबद्दलचा हा लेख वाचा अनुभव जानेवारी २०२०च्या अंकात.



कुणाल कामरा 

प्लीज डोन्ट शट अप या कुणाल !


कुणाल कामरा बारमध्ये शिरतो तेव्हा तीन माणसं त्याच्याकडे वळतात आणि म्हणतात, “जा, जा के पप्पू की चाट!”
हा विनोद खुद्द कुणाल कामराच सांगतो- अनेकांना. त्याच्या शैलीत तो मिश्कील हसतही असणार हा विनोद सांगताना.
त्याच्यावर असा विनोद का व्हावा?
तो तर एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. त्याच्या शोजमध्ये तो साधारण तासभर लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर सहज सुचल्यासारख्या गप्पा मारत बोलतो, त्यात जबरदस्त पंचेस टाकतो. ते ऐकून लोक पोट धरधरून हसतात आणि फ्रेश होऊन बाहेर पडतात.
आता हे काम करणाऱ्यावर सध्या विनोद का व्हावा?
कारण तो, एका विशिष्ट वर्गाच्या भाषेत सांगायचं तर, देशद्रोही, हिंदुद्रोही, फेक्युलर, खांग्रेसी, लिबटार्ड आहे. म्हणजे इतकंच, की तो भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या विरोधात बोलतो. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर नाव घेऊन विनोद करतो. हे दोघं गंगा-जमनी संस्कृतीच्या कर्दमात खितपत पडलेल्या हिंदुराष्ट्राचा उद्धार करायलाच जन्माला आलेले आहेत, अशी समजूत असलेल्यांची देशात कमतरता नाही. आधीच अतिहळहळ्या आणि भावनादुखावू बनून बसलेल्या समाजात या मंडळींना आपल्या ‘दैवतां’वर विनोद झालेले खपत नाहीत. मग ते कुणालला जिवे मारण्याच्या धमक्या देतात, त्याच्या ट्विटर अकाउंटवर त्याला ट्रोल करतात, त्याचे शोज रद्द करायला लावतात. काही वेळा शो होणार असूनसुद्धा त्याची तिकिटं काढलेल्यांना शो रद्द झाल्याचे खोटे मेसेजेस पाठवतात.
बाप रे! फक्त विनोद करणाऱ्या माणसाची इतकी धास्ती?
कुणालला विचारा. तो म्हणतो, “व्यवस्थेला विनोद करणार्‍या माणसाचीच इतकी धास्ती असू असते. कारण इथे मुक्त विचार करू शकणारा प्रत्येक माणूस देशद्रोही आहे. आणि मायक्रोफोन हे वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे. म्हणजे कुणाल कामरा हा एके फिफ्टी सिक्समधून गोळीबार करत सुटलेला दहशतवादीच आहे म्हणायचा!”
स्टँड-अप कॉमेडीशी फारसा परिचय नसलेल्यांना हा मनोरंजन प्रकार तरुणाईत किती लोकप्रिय आहे याचीही काही कल्पना नसेल. तरुण मुलं सतत मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा ‘क्लिपा’ पाहत असतात अशी मोठ्यांची समजूत असते. अनेकदा ही मुलं देशविदेशातला जबरदस्त कंटेंट पाहत असतात. त्यातला त्यांच्या आवडीचा कंटेंट म्हणजे स्टँड-अप कॉमेडी.
दशकभरापूर्वी जिथे उच्चभ्रू तरुणाई एकत्र येते अशा महानगरांमधल्या काही मोजक्या ठिकाणी ओपन माइक दिसू लागले. तिथे येऊन कुणीही काहीही बोलावं, काहीही सादर करावं, आपले विचार मांडावेत, अशी ही कल्पना. त्यातून काही मंडळी सफाईदारपणे आणि विनोदाची फोडणी देऊन मनोरंजन करू शकतात हे लक्षात येऊ लागलं आणि स्टँड-अप कॉमेडियन म्हणून काही कलाकार ओळखले जाऊ लागले. त्यांचे खास शोज होऊ लागले. काहींची लोकप्रियता इतकी वाढली, की लाफ क्लब्ज किंवा तत्सम छोट्या ठिकाणांच्या बाहेर, ऑडिटोरियम्समध्येही त्यांचे तिकीट लावून कार्यक्रम होऊ लागले. आज अनेक कलाकार अर्ध्या तासाचे 20 ते 40 हजार रुपये चार्ज करतात, इतका हा प्रकार लोकप्रिय आहे.
कुणाल कामरा हे यांच्यातलं आजचं आघाडीचं नाव.
तो कदाचित आजघडीचा सगळ्यात लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियनही असेल. त्याचं यूट्यूबवरचं फॉलोइंग 10 लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्याचा एकेक व्हिडिओ 60-70 लाख लोकांपर्यंतही पोहोचल्याची नोंद आहे.
स्टँड-अप कॉमेडी आपल्याला खरं तर नवी नाही. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, व. पु. काळे यांचं कथाकथन आणि पु. ल. देशपांड्यांचं अभिवाचन हे एका अर्थाने स्टँड-अप कॉमेडीचेच प्रकार होते. देशपातळीवर 80-90च्या दशकात जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव आदी मंडळी फिल्मस्टार्सच्या नकलांवर आधारित कार्यक्रम सादर करायची तीही स्टँडअप कॉमेडीच होती; पण हे सगळे ‘गुदगुल्या करून हशिवन्या’चे उपक्रम होते. तसे अनेक शोज अजूनही चॅनेलोचॅनेली सुरू असतातच. मात्र, आजची स्टँड-अप कॉमेडी ज्या अर्थाने बहरलेली आहे, त्याच्याशी साधर्म्य सांगणारी स्टँड-अप कॉमेडी शेखर सुमनच्या ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ने पहिल्यांदा भारतात मेनस्ट्रीममध्ये आणली. या कार्यक्रमात शेखर त्या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी सांगून त्यावर जे चुरचुरीत भाष्य करायचा ते अनेकांना चिमटे काढणारं असायचं. तीच परंपरा आजही अनेक स्टँड-अप कॉमिक्स पुढे चालवताना दिसतात. ते वेगवेगळ्या विषयांवर कधी स्वत:ला, कधी इतरांना, कधी नेत्यांना, कधी सेलिब्रिटींना तर कधी थेट प्रेक्षकांनाच चिमटे काढतात.
कुणाल कामरा या सगळ्यांमध्ये वेगळा आहे. तो किरकोळ चिमटे नाही काढत; बोचकारतो आणि रक्त काढतो. आपल्याकडे निर्विष विनोदाचं फार स्तोम आहे. विनोद तर झाला पाहिजे, पण कुणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत, कुणावर टीका नाही झाली पाहिजे, असं सगळं छान छान, गुडी गुडी हवं असतं लोकांना कॉमेडीच्या नावाखाली.
कुणाल या सगळ्याला छेद देतो. उदाहरणार्थ, त्याच्या एका लोकप्रिय स्किटमध्ये तो म्हणतो, “एनआरआय मंडळींमध्ये मोदींची लोकप्रियता इतकी आहे आणि जगात प्रत्येक गोष्ट मोदींना सहजसाध्य आहे अशी त्यांची इतकी पक्की समजूत आहे, की मोदीजींनी कधी परदेशात क्रिकेट सामना पाहायला जाऊ नये. विजयासाठी प्रचंड धावा काढायच्यात, ओव्हर कमी आहेत आणि सगळे महत्त्वाचे गडी बाद झालेले आहेत, अशा अवस्थेत हे लोक ‘मोदी, मोदी’चा जयघोष करून त्यांना पॅड बांधून मैदानात यायला लावतील. मग अमित शाह बोलरचे हात कापून टाकतील. बोलर तोंडाने बॉल टाकेल. चुकून जिभेने स्पिन व्हायला नको म्हणून तीही कापलेलीच असेल. तो बॉल स्टंपला लागला असला तरी अंपायर नॉट आऊट सांगेल. फील्डर स्वत: बॉल उचलून सीमारेषेपर्यंत धावत जाईल. अंपायर सिक्सर घोषित करेल आणि मोदी मीडिया मोदींनी सेंच्युरी मारल्याचं जाहीर करून मोकळा होईल.”
मोदी म्हणजेच देश, असं भक्तिभावाने मानणार्‍यांसाठी हा इतका वाकड्यात शिरणारा माणूस देशद्रोही पाकडाच असेल ना!
कुणाल कामराने पहिल्यांदा जबरदस्त ‘देशद्रोह’ केला तो 2017 साली. ‘पॅट्रिऑटिझम अँड द गव्हर्नमेंट’ या शीर्षकाच्या अवघ्या आठ मिनिटांच्या त्याच्या क्लिपने हलकल्लोळ माजवून दिला. आजपर्यंत हा व्हिडिओ एक कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. विषय अगदी साधा होता. नोटबंदी अर्थात निश्चलनीकरण नुकतंच झालं होतं. लोकांना बँकांबाहेर रांगा लावायला लागत होत्या. रोज नवनवे आणि विचित्र फतवे निघत होते. काळ्या पैशांवर प्रहार करायला निघालेल्या सरकारने प्रत्यक्षात गोरगरिबांच्या, सामान्य नागरिकांच्या साठवणीतल्या रोख रकमांवर प्रहार करून टाकला होता. वीसच दिवसांत सरकारने डिजिटायझेशनचं आणि कॅशलेस इकॉनॉमीचं नवं तुणतुणं वाजवायला घेतलं होतं. या विनोदी निर्णयाने आता काळा पैसावाले रस्त्यावर येणार, या कल्पनेने रांगेत उभं राहण्याचं दु:खही लोक सहन करत होते. आपल्याला काही मिळो ना मिळो, कुणी तरी रस्त्यावर आल्याचा आनंद काही वेगळाच असतो ना! या सगळ्या आचरटपणावर (रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या जवळपास सगळ्याच नोटा बँकिंग व्यवस्थेतूनच परत आल्यामुळे हा आचरटपणाच होता हे आता स्वयंसिद्ध आहे) प्रश्न विचारणार्‍याला ‘तिकडे सीमेवर जवान लढतायत आणि तुम्ही साधी लाइन लावू शकत नाही?’ असं कशाशीही संबंध नसलेलं वाह्यात वचन ऐकवलं जात होतं. कुणालने हीच सिच्युएशन घेतली आणि फुलवत नेली. या स्किटमध्ये तो सांगतो,
“बँकेसमोरच्या रांगेत मला एकजण म्हणाला, हा देश फारच तापदायक झालाय यार. तेवढ्यात मागून एक अंकल आले आणि म्हणाले, सियाचेन में हमारे जवान लड़ रहे हैं और आप लाइन में खड़े नहीं रह सकते? यावर माझ्याशी बोलत असलेला तो तरुण म्हणाला, अंकल, मैंही हूँ वो जवान। मी तिथे सीमेवर उभा होतो. इथे घरच्यांबरोबर सुट्टी व्यतीत करण्यासाठी आलो, तर एटीएमच्या लायनीत उभा आहे. तुम्हाला उभं राहण्याचा इतका शौक असेल तर सीमेवर या ना. इथे दोन हजार रुपये काढून काय उखडणार आहात?” आपल्या सरकारचं अपयश झाकण्यासाठी निर्लज्जपणे देशभक्तीची दुभती गाय पिळणार्‍यांना चपराक हाणणार्‍या या व्हिडिओमध्ये कुणालने सरकार आणि नागरिक यांच्यातला बेसिक संबंध स्पष्ट केला आहे. तो म्हणतो, “सरकार सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि आपण टॅक्सपेयर आहोत. त्यांनी त्या बदल्यात आपल्याला सेवा पुरवायच्या असतात. तू व्होडाफोनच्या बाबतीत इमोशनल असतोस का? व्होडाफोनच्या सीईओला नावं ठेवायची नाहीत हां, असा अंगावर जातोस का? भारत-पाकिस्तान प्रश्न सुटला तर तुम्ही विचारायला लागाल, माझ्याकडे स्वच्छ पाणी का येत नाही? माझ्या दारात कुणी तरी हगून ठेवलंय ते साफ कधी होणार? त्यामुळे हा प्रश्न कधीच सुटणार नाही.”
या व्हिडिओने कुणाल रातोरात ‘देशभक्तां’च्या डोक्यात घुसला. या माणसाकडून कुणालाही असली काही अपेक्षा नव्हती. 2013पासून कुणाल कॉमेडी करतच होता. मग अचानक असं काय झालं?...
मुळात हा जाहिरातीच्या जगतातला मनुष्य 10 वर्षांची सुखाची नोकरी सोडून कॉमेडीकडे का वळला होता? हे समजण्यासाठी कुणालच्या बालपणात डोकावायला हवं.
कुणाल हा टिपिकल मुंबईकर मुलगा.
तो शिवाजी पार्कच्या परिसरात राहतो. आज तो 31 वर्षांचा आहे. एवढ्या काळात त्याचा पिनकोडही फार वेळा बदललेला नाही. ‘सियाचेन में हमारे जवान’च्या व्हिडिओनंतर त्याच्या घरमालकिणीने एवढा स्फोटक भाडेकरू आपल्याकडे नको म्हणून त्याला घर रिकामं करायला लावलं, आणि त्याने दुसरा फ्लॅट घेतला, तेवढाच काय तो बदल.
त्याचं बालपण अगदी सामान्य, कुणाचंही असतं तसंच होतं. वडिलांचं केमिस्टचं दुकान होतं. त्यावर घर चालत होतं. याला शिक्षणाचा कंटाळा. त्यात डिसलेक्सिया झालेला. त्यामुळे आजही तो प्रदीर्घ मेलसुद्धा वाचू शकत नाही. पुस्तकं कुठून वाचणार? त्याच्या आयुष्याच्या कल्पना अगदी साध्या होत्या. दुबईत एखाद्या ज्वेलरी शॉपमध्ये मॅनेजर बनायचं, भरपूर पैसे कमावायचे, इतकं साधं स्वप्न होतं. त्याने वयाच्या 17व्या वर्षी कॉलेजातून ड्रॉप-आऊट केलं आणि तो सरळ एमटीव्हीमध्ये शिकाऊ उमेदवारी करायला लागला. घरच्यांना वाटायचं, कॉलेजलाच चाललाय. तिथून त्याला प्रसून पांडे यांच्या कॉरकॉइज फिल्म्समध्ये नोकरी मिळाली. अ‍ॅड फिल्म्सच्या क्षेत्रात त्याने प्रॉडक्शनची भरपूर कामं केली. फेविकॉलच्या सुप्रसिद्ध अ‍ॅड्सपासून अनेक अ‍ॅड्स सुपरव्हाइज केल्या.
चांगले पैसे मिळू लागले. ठाण्यात फ्लॅट, गाडी वगैरे घेण्याइतपत पगार मिळायला लागला, तेव्हा त्याने घरी सांगितलं, की मी कॉलेजशिक्षण पूर्णच नाही केलं. अ‍ॅडव्हर्टायझिंगचं क्षेत्र हे नवोन्मेषशाली. त्यात खरं तर कुणी कंटाळू शकत नाही. रोज काही तरी नवं घडत असतं, घडवायचं असतं. कुणालने तर सर्व प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडल्या होत्या या क्षेत्रातल्या. तरीही 2013ला त्याला जाम बोअर व्हायला लागलं. कामाच्या वेळेनंतर गिटार वगैरे वाजवायला शिकू या, असा त्याचा विचार होता. सिद्धार्थ दुदेजा या मित्राने बहुधा कुणालची बोलण्याची शैली लक्षात घेऊन त्याला स्टँड-अप कॉमेडीकडे वळण्याचा सल्ला दिला. 2013मध्ये त्याचं अपघातानेच या क्षेत्रात पदार्पण झालं. मुंबईतल्या लोअर परळमध्ये कॅनव्हास लाफ क्लबमध्ये करुणेश तलवार या मित्राचा एक शो होता. काही गफलतीमुळे करुणेश तिथे पोहोचलाच नाही. आधीचा भाग साफ पडेल ठरला होता. प्रेक्षक अस्वस्थ होते. आयोजकांनी कुणालला वेळ मारून न्यायला सांगितलं; आणि त्याने धमाल उडवून दिली. प्रेक्षकांत वीर दास आणि अमोघ रणदिवे हे स्टँड-अप कॉमेडियनही बसले होते. त्यांनी त्याला आपल्या वियर्डअ‍ॅस कंपनीसाठी गॅग्ज लिहायला बोलावलं. कुणाल कामराची स्टँड-अप सर्किटमध्ये ही अशी एन्ट्री झाली
तरीही 2013 ते 2017 या काळात तो टिपिकल गुदगुल्याछाप कॉमेडी करायचा. स्टँड-अप कॉमिक्सचा प्रेक्षक आहे शुद्ध शहरी, आंग्लाळलेला उच्च मध्यमवर्गीय तरुण वर्ग. त्यांच्याशी त्यांच्या भाषेत, हिंदी-इंग्लिश मिक्स मारून, अध्येमध्ये हलक्याफुलक्या अपशब्दांची पेरणी करून दर काही सेकंदांना हशा पिकवायचा, हे मुख्य काम. कुणाल आता म्हणतो, की तेव्हा मी जे काही करत होतो ते भयंकर होतं. एक तर तो बायकांवर विनोद करत होता, तेही अगदीच आचरट. जाड्या आंट्या, मुंबईचे टॅक्सीवाले किंवा कॅबवाले, जिथे तिथे नाक खुपसणारे वैतागवाणे अंकल लोक हे त्याच्या विनोदांचे विषय असायचे. हे सगळं 2017ला अचानक कसं बदललं?
खरं तर ते अचानक नाही बदललं. कुणालमध्ये काही तरी वेगळा स्पार्क आहे याची जाणीव वरुण ग्रोवर आणि संजय राजौरा या त्याच्या ज्येष्ठ मित्रांना होती. हे दोघं आणि राहुल राम ही ‘ऐसी तैसी डेमॉक्रसी’ची तिकडी त्याला राजकीय भाष्य करायला सांगत होती. अनुवब पाल या ज्येष्ठ स्टँड-अप कॉमेडियनला कुणाल आपला मेंटॉर मानतो. त्याने त्याला त्याचं काही मत असण्याचं महत्त्व पटवून दिलं; पण कुणालला खरा धक्का दिला तो रोहित वेमुलाच्या आत्महत्येने.
रोहित वेमुलाच्या हत्येपाठोपाठ जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचं कारस्थान रंगात आलं आणि वास्तवातल्या तुकडे तुकडे गँगने कल्पनेतली तुकडे तुकडे गँग जन्माला घातली तेव्हा कुणाल हादरला. इतक्या सहजगत्या नॅरेटिव्ह हायजॅक होतं, इतक्या मूर्ख पद्धतीने अख्खा मीडिया अपप्रचाराला बळी पडतो, इतक्या सहजगत्या देशभक्तीच्या नावाखाली द्वेष खपवला जातो हे पाहिल्यावर तो हादरला. कन्हय्या कुमार, उमर खालीद, रवीश कुमार ही मोजकी मंडळी काय धाडस करतायत हे त्याच्या लक्षात आलं आणि एरवी निरुपद्रवी गुदगुल्या करणार्‍या कुणालच्या विनोदाने नखं काढली. त्याच्या गुदगुल्या अस्वली गुदगुल्या बनू लागल्या.
तिशीतला कुणाल अर्ध्या टकलामुळे आणि अस्ताव्यस्त दाढीमिश्या, नाकावर येणारा गोल मोठ्या काड्यांचा चष्मा यांच्यामुळे चाळिशीपारचा दिसतो. काही वर्षांपूर्वी तो छान गोलमटोल होता तेव्हा टेडी बेअर दिसायचा. आता प्रयत्नपूर्वक 50 किलो वजन घटवल्यामुळे तो डाएटवर असलेल्या टेडी बेअरसारखा दिसतो, पण विनोद मात्र ज्याच्यावर टीका केली जाते आहे त्याचा कोथळाच काढणारा.
नरेंद्र मोदी, अमित शाह, संबित पात्रा आणि अर्णब गोस्वामी ही त्याची हमखास यशस्वी लक्ष्यं असतात. तो काँग्रेसवर विनोद करत नाही म्हणून तो काँग्रेसीच आहे, काँग्रेसचा दलाल आहे, अशी टीका त्याचे ‘चाहते’ करत असतात. तो म्हणतो, ‘विनोद आणि टीका सत्ताधार्‍यांवर, प्रस्थापितांवरच केली पाहिजे. त्यांच्याकडून झालेल्या फसवणुकीची प्रतिक्रिया असते ती. काँग्रेस ही एका घराण्याभोवती फिरणारी कमालीची कणाहीन अशी संघटना आहे. तिच्यावर विनोद करावेत इतकीही तिची योग्यता राहिलेली नाही. म्हणून मी त्यांच्यावर विनोदही करण्याच्या फंदात पडत नाही. या लोकांना वाटतं की लहानपणापासून राहुल गांधीच माझ्या शाळेच्या टिफीनमधल्या सँडविचला जॅम लावायचं काम करत असणार!’
एकीकडे प्रस्थापितांवर बोचरे विनोद करत असताना दुसरीकडे ‘शट-अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये कुणाल वेगवेगळ्या माणसांना बोलतं करत असतो. हा वरवर पाहता मुलाखतींचा कार्यक्रम आहे; पण इथे कुणालचं वेगळं रूप पाहायला मिळतं. भारंभार लोकांना स्टुडिओमध्ये गेस्ट म्हणून बोलवायचं आणि त्यांना बोलूच न देता आपणच बकबक करत राहायचं किंवा काही तरी उथळ प्रश्न विचारायचे, त्यांच्यात भांडणं लावून द्यायची आणि थिल्लर टीआरपी मिळवायचा, या न्यूज चॅनेली फंड्यात गुदमरलेल्या टीव्ही पत्रकारितेला वेगळाच आयाम देणारा हा कार्यक्रम आहे. अरविंद केजरीवाल, कन्हय्या कुमार, उमर खालीद, जिग्नेश मेवानी, शेहला रशीद, मिलिंद देवरा, सचिन पायलट यांच्यापासून जावेद अख्तर, योगेंद्र यादव, अनुभव सिन्हा, आनंद गांधी यांच्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मंडळींना कुणाल इथे अतिशय सन्मानपूर्वक बोलतं करतो, त्यांना बोलू देतो, उगाच लक्षवेधी टिप्पण्या करत नाही. या सगळ्याला फोडणी असते ती मीम्सची म्हणजे गंमतचित्रांची आठवण करून देईल अशा प्रकारे एडिट केलेल्या मोंताजेसची. रमित वर्मा हा या शोचा क्रिएटिव्ह डायरेक्टर. तो काही तरी भन्नाट गाणी शोधून काढतो, लूप शोधून काढतो आणि त्यावर अर्णब, मोदी यांची पालुपदं वापरून धमाल मिक्सची जोड या कार्यक्रमाला देतो.
देशात कॉमेडीची धूम आहे. चॅनेलांवरच्या स्वसेन्सॉरग्रस्त भयचकित आणि त्यामुळेच मिळमिळीत, पचपचीत कॉमेडीपेक्षा सेन्सॉरमुक्त स्टँड-अप कॉमेडी तरुणाईला अधिक आवडते. ती त्यांची भाषा बोलते. त्यामुळेच अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स यांच्यासारख्या वेब बेस्ड प्लॅटफॉर्म्सनीही कॉमेडियन्सना उत्तेजन देणारे शो सुरू केले आहेत. कुणालने मात्र तिकडे मोर्चा वळवलेला नाही. तो त्याचे त्याचे कार्यक्रम करतो. त्यातले काही एडिट अधूनमधून यूट्यूबवर टाकतो.
तो कधीही विनोद लिहून काढत नाही, डोक्यात ठेवतो. एक तासाचा कार्यक्रम असेल तर त्यात तो काय बोलणार यातला 60 टक्के भाग त्याच्या डोक्यात तयार असतो. तो कोणत्या दिशेला चाललाय हे ऑडियन्सला समजतही नाही. अधूनमधून तो त्यांच्याही टोप्या उडवत असतो. या तासाभरात लोकांना हसवायचंय, हे त्याचं प्रमुख लक्ष्य असतं.
कुणाल टिपिकल तिशीतला तरुण आहे- आळशी. घराचं भाडं भरावं लागतं, चांगली लाइफस्टाइल हवी म्हणून काम करतोय, असं सांगणारा. त्याचा फंडा क्लियर आहे. तो एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. लोक त्याच्या कार्यक्रमांना येतात ते हसण्यासाठी येतात. तो त्यांना बोचणार्‍या गोष्टी मांडतो, त्यातून काही विषयांवर वेगळ्याच प्रकारचा प्रकाशही टाकतो. पण, तो म्हणतो, की लोक फक्त हसायलाच आलेले असतात. तुम्ही आरक्षणविरोधी जोक करा, ते हसतात. आरक्षणाच्या बाजूने जोक करा, ते पुन्हा हसतात. कार्यक्रम झाल्यावर ‘मज़ा आया,’ ‘सही है’ अशा प्रतिक्रिया खूप मिळतात; पण ‘तू माझे विचार बदललेस’ असं बोलणारा एकही बंदा काही भेटत नाही कुठे.
पण, हे सगळं खरं असलं तरी तो कुठे तरी काही तरी हलचल करतोच आहे. शेहला रशीद म्हणते, की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभही आता इतका ‘पक्ष’पाती बनला आहे की स्टँड-अप कॉमेडियन्स हाच आता खरा चौथा स्तंभ आहे. कुणाल त्या स्तंभाचाच पाईक आहे. तो गोड गुळगुळीत व्हॅनिला कॉमेडी करत नाही, नुसती कॉमेडीही करत नाही.
वेळ आली की ट्विटरवर ‘डोन्ट व्होट फॉर मोदी’ असा फलक घेऊन उभाही राहतो
त्याच्यावर सतत खार खाऊन असलेल्या सरकार पक्षाच्या ट्रोल मंडळींना त्याचं तोंड बंद करण्याची खुमखुमी असते. पण, उदारमतवादी विचारस्वातंत्र्य मानणारी तरुणाई त्याला जी मनमोकळी दाद देते, त्यातून जणू सांगत असते, ‘प्लीज डोन्ट शट अप या कुणाल!’
- मुकेश माचकर
अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।
PDF अंक वार्षिक - ₹ ४००
• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - ९९२२४ ३३६१४
• वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik
To connect with us follow-
Instagram- @unique_features3
Twitter- https://twitter.com/UniqueFeatures

टिप्पण्या

  1. Y Agriculture in Hindoosthan is doomed,and so is Hindoosthan Dindoosthan ! Part 1

    In essence,Plant Agronomy has developed to an extent that Africa could produce all the food in the world for the Moon,Earth and Mars and all the aliens.However,that will crash agri prices and make obsolete conventional agri practices and cause economic shock and political catastrophe - all over the world - and start WW3.

    Hence,the technology is being suppressed by the West.

    What is the worth of an Indian Nigger - except to clean toilets and cowdung and drink cow piss cola ?

    Doom 1

    Global warming - leading to erratic and shortage of rainfall,and no water when it is needed.This is enough to make the farmers hang, from a banana tree

    Doom 2

    Depleted water table and lack of power, as it is sucked out by the industry,who use up all the dam and gas based peak load power - leaving the DindoooHindoo farmer - to do frog marriages for rain - like in Assam.

    https://www.newindianexpress.com/nation/2016/aug/29/Bizarre-frog-weddings-for-rain-It-happens-in-Assam-1514191.html

    Peak load power is for industry and is unviable for agriculture.1 kwh of power in industry,will add economic value and revenue, for the bankrupt Hindoo state,and also,USD from exports.1 kwh of power, on a marginal basis, will produce diseased and rotten crops, which will be sold at less than 15% of the marginal cost, and will rot in FCI Godowns.

    Doom 3

    Marginalised land holdings with continually diminished earnings and the quartering of land holdings, with each generation

    Doom 4

    Reduction in farm labour - at imputed and marginal cost.Declining trend of self employed dindooohindoo farmers on land holdings - due to migration to cities - with labour shortage at key phases in agri value chain and higher marginal cost.

    Doom 5

    Inability of farners to use mechanisation due to lack of funds, holdings,water and power

    Like I said,Indans are vermin but,it needs a confluence of verminage and imbecility,to doom Hindoo agriculture.dindooohindoo

    उत्तर द्याहटवा
  2. Y Agriculture in Hindoosthan is doomed,and so is Hindoosthan Dindoosthan ! Part 2

    The Plan of The Hindoo Brahmin and Bania scum.dindooohindoo

    Step 1

    The Hindoo Brahmin and Bania scum, want to doom Hindoo agriculture - SLOWLY AND SURELY - LIKE SLOW POISON.In any case,large parts of Indian land are permanently damaged, due to urea,lead and arsenic poisoning,which explains why HINDOOSTHAN IS THE IMPOTENCE CAPITAL OF the World

    https://www.outlookindia.com/magazine/story/india-is-the-impotence-capital-of-the-world/239548

    Step 2

    The thought process of the Brahmin and Bania scum is simple.They want a perpetual exodus from farm to cities - to ensure abundant menial labour supply,lower wages and a surplus labour market -
    which will ensure no trade unions in factories and industries.In addition, the agri lands become fallow and barren,as there is no self employed labour and so,the agri-holdings are ripe,for land
    grabbing under the guise of industrialisation,infrastructure and national development.

    Step 3

    The Infra plans of the Hindoo nation,are known only to netas,baboos and tycoons,who corner land near the infra sites (which are the direct beneficiaries,of the infra projects).It is also a critical part of the agri speculation matrix,as it s key to identify the lands which will not produce,or create sub standard produce.Once that is a constant - it is easy to plan shortages,hoarding and rumour mongering - for agri speculation.

    Step 4

    The industrial and consumer power tariffs bear the cross-subisdy of the free and discounted power, sold to farmers.Continued
    destruction of the farmers and their migration (which is the most important tool to destroy farners)will kill the agri-demand,as the farmers will cease operations,and the marginal farmers will not be able to bear the upfront cost of power infrastructure.This will eventually lower industrial and consumer power tariffs,boosting profits and consumer electricity consumption.All the industry and consumer electronics entities, are owned by Bania scum,and staffed by Brahmin/Kayastha/Bania scum.

    Step 5

    The Brahmin/Bania vermin are aware that even if 100 million farmers drink cow piss and rat poison, with 1 bottle of Goan fenee - there will still be, agri-excess production - even w/o agri technologies and corporate agriculture.Instead of the Indian farmers dying - they could clean toilets and work in Indian Industry and Infrastructure.Hence,the BRAHMIN-BANIA VERMIN DOES NOT CORRECT THE AGRI PRICES AND SHORTAGE DISASTER.

    Step 6

    With all the money saved by the Indian industry,by destroying the farmers,the Chaiwala and Fat Pancho Amit Shah,develop new schemes to keep farmers IDLE for a fee - which are notional transfer payments,to the farmers - which net the farmer,more than he would earn from farming and eventually shift him to the cities.It is also a form of legalised vote purchase from menials

    Step 7

    It is said that the rats who pray to Lord Gand-Phatee,eat a billion USD of food grains,in the FCI godowns each year.The Brahmin/ Bania vermin does not deem it fit to give away the foodgrains to farmers, BPL and other destitutes.The netas and baboos of the Ministry of Agriculture, are on the payroll of the international traders on CBOT and other exchanges - to ensure that the Hindoo vermin does not dump its holdings.The netas and baboos also ensure that other agri exporters profit from the Nil exports of the Hindooo Dindoo - whose stocks are enough to hold prices in agri-exchanges.This is not because the bania vermin wants to help Brazil and LDC exporters,per se.It is because the Brahmin-Bania vermin are duds, who have no faith on the capability of the agri-value chain to perform, and respond to one-off or dynamic agri trading, in global markets.The mortal fear of the netas and baboos is food riots,agri shortages and rising prices.This is after 70 years of the creation of the Dubious Hindoo Dindoo nation

    उत्तर द्याहटवा
  3. STATISTICS !

    MEANINHGLESS IN HINDOOSTHAN !

    THE CRUX !

    EXPLOITATION !

    2000 YEARS AGO IT WAS THE BRAHMIJNS AND KSHATRIYAS !

    TODAY IT IS THE BANIAS

    I QUOTE BR AMBEDKAR IN PAGE 4357 of Selected Works of Dr BR Ambedkar

    The Bania is the worst parasitic class known to history. In him the vice of money-making is unredeemed by culture or conscience. He is like an undertaker who prospers when there is an epidemic. The only difference between the undertaker and the Bania is that the undertaker does not create an epidemic while the Bania does. He does not use his money for productive purposes. He uses it to create poverty and more poverty by lending money for unproductive purposes. He lives on interest and as he is told by his religion that money-lending is the occupation prescribed to him by the divine Manu, he looks upon money-lending as both right and righteous. With the help and assistance of the Brahmin judge who is ready to decree his suits, the Bania is able to carry on his trade with the greatest ease. Interest, interest on interest, he adds on and on, and thereby draws millions of families perpetually into his net. Pay him as much as he may, the debtor is always in debt. With no conscience to check him there is no fraud, and there is no chicanery which he will not commit. His grip over
    the nation is complete. The whole of poor, starving, illiterate India is irredeemably mortgaged to the Bania.

    In every country there is a governing class. No country is free from it. But is there anywhere in the world a governing class with such selfish, diseased and dangerous and perverse mentality, with such a hideous and infamous philosophy of life which advocates the trampling down of the servile classes to sustain the power and glory of the governing class? I know of none

    BUT THE INDIAN DUDS DO NOT GET IT !

    THHE ENTIRE POST PRODUCTION SUPPLY CHAIN IS CONTROLLED BY BANIAS WHO ARE O/S THE FISCAL NET.IF FARMER GETS RS 1 THE USER PAYS RS 10 !

    THAT RS 9 OF VALUE HAS A ECONOMIC VALUE ADDITION OF RS 2 ! IT CAN BE OUTSOURCED TO WALMARRT FOR RS 1.5

    IF YOU ELIMNINATE THE BANIA - YOU HAVE PARADISE !

    CHAIWALA IS A BANIA !

    MORE THAN A 1000 YEARS AGO THE WHITE HUNS DESTROYED THE GUPTA EMPIRE TO BITS ! THE INDIAN DALITS ARE WAITING FOR A TURKISH/MONGOL AND PAKISANI/TALIBAN ATTACK !

    THAT IS THE ONLY HOPE FOR INDDIAN DESTITUTES ! dindooohindoo


    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८