संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी
अनुभव दिवाळी २०२० च्या अंकातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यशैली आणि संघाच्या स्वयंसेवकांचं विचारविश्व हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. संघाच्या स्थानिक वर्तुळात चार दशकं डोळसपणे वावरलेल्या एका सजग व्यक्तीला मागे वळून पाहताना या दोहोंबद्दल काय वाटतं ? बा हेर धो धो पाऊस पडत आहे. दाटून आलेली संध्याकाळ आणखीच दाटून आली आहे असं वाटून राहिलं आहे. मला उशीर झाला आहे... अर्धामुर्धा भिजलेला मी पेंडशांच्या वाड्यात वरच्या हॉलमध्ये जाणारे लाकडी जिने धडधड चढतो. हॉलमधून येणारा पद्याचा आवाज क्रमश: मोठा होत जातो, त्याच क्रमाने मला उशीर झाल्यामुळे आलेलं ओशाळेपण हलकंसं वाढत जातं... दारात चपलांच्या रांगा लागलेल्या आहेत. भिजलेल्या छत्र्यांसाठी बादली ठेवलेली आहे. राज भागवत चपलांच्या रांगांपाशी उभा आहे. मी चपला ओळीत काढतो की नाही यावर त्याचं लक्ष आहे. त्याच्याकडे मी पाहत नाही, पण त्याच्या नजरेचं मला भान आहे... मी चपला बरोबर काढतो. आत शिरताना त्याची-माझी नजरानजर होते. त्याचा चेहरा तसाच गंभीर राहतो... तो हेच काम आणखी किती वर्षं करणार, असं मला क्षणभर वाटून जातं... मी हॉलमध्ये शिरतो. पद्याचं दुसरं कडवं सं
CAA, NRC हे कायदे भारताला गरजेचे आहेत ,नको त्या लोकांना पब्लिसिटी देऊन पत्रकारितेचा अवमान करू नका.
उत्तर द्याहटवा