दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचा आज पहिला स्मृतिदिन. समकालीन प्रकाशन आणि युनिक फिचर्सचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख, सुहास कुलकर्णी यांच्या अवलिये आप्त या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. काही माणसं खूप आधीपासून आपल्या आयुष्याचा भाग असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात बर्याच नंतर भेटतात. अनिल अवचट यांच्या बाबतीत माझं असंच झालं. शाळा-कॉलेजमध्ये असताना जी पहिली लक्षात राहतील अशी पुस्तकं वाचली, त्यात अवचटांची पुस्तकं होती. या अर्थाने अवचट आयुष्यात आले ते वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी. लेखक म्हणून. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद सुरू होण्यासाठी त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षं जावी लागली. पण जेव्हा त्यांची भेट झाली, त्यानंतर हा आवडता लेखक मित्रच बनून गेला. पूर्णिया, वेध, छेद, संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे उभे, धार्मिक, माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न अशी पुस्तकं वाचतच आमची पिढी मोठी झाली. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे, याची जाणीव या पुस्तकांनी करून दिली होती. आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी
अनुभव दिवाळी २०२० च्या अंकातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यशैली आणि संघाच्या स्वयंसेवकांचं विचारविश्व हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. संघाच्या स्थानिक वर्तुळात चार दशकं डोळसपणे वावरलेल्या एका सजग व्यक्तीला मागे वळून पाहताना या दोहोंबद्दल काय वाटतं ? बा हेर धो धो पाऊस पडत आहे. दाटून आलेली संध्याकाळ आणखीच दाटून आली आहे असं वाटून राहिलं आहे. मला उशीर झाला आहे... अर्धामुर्धा भिजलेला मी पेंडशांच्या वाड्यात वरच्या हॉलमध्ये जाणारे लाकडी जिने धडधड चढतो. हॉलमधून येणारा पद्याचा आवाज क्रमश: मोठा होत जातो, त्याच क्रमाने मला उशीर झाल्यामुळे आलेलं ओशाळेपण हलकंसं वाढत जातं... दारात चपलांच्या रांगा लागलेल्या आहेत. भिजलेल्या छत्र्यांसाठी बादली ठेवलेली आहे. राज भागवत चपलांच्या रांगांपाशी उभा आहे. मी चपला ओळीत काढतो की नाही यावर त्याचं लक्ष आहे. त्याच्याकडे मी पाहत नाही, पण त्याच्या नजरेचं मला भान आहे... मी चपला बरोबर काढतो. आत शिरताना त्याची-माझी नजरानजर होते. त्याचा चेहरा तसाच गंभीर राहतो... तो हेच काम आणखी किती वर्षं करणार, असं मला क्षणभर वाटून जातं... मी हॉलमध्ये शिरतो. पद्याचं दुसरं कडव...
टेनिस क्रिकेटचं अज्ञात विश्व: तुषार कलबुर्गी क्रिकेटच्या मुख्य धारेत प्रवेश मिळू न शकलेल्यांनी गेल्या काही वर्षांत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. व्यवस्थेविरुद्ध जणू बंड पुकारत उभारलेल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अज्ञात, पण थरारक विश्वाचा फेरफटका. भारतातली बहुतेक मुलं लहानपणापासून क्रिकेट खेळतात. ज्यांच्यात विशेष कौशल्य असतं, ती कधी ना कधी भारताकडून खेळायचं असं स्वप्न बाळगून असतात. पण साऱ्यांचीच स्वप्नं पुरी होत नाहीत. मग अंगात हुनर अन् खेळण्याची जिगर असलेले हे खेळाडू काय करतात? क्रिकेटच्या मुख्य धारेत प्रवेश मिळू न शकलेल्यांनी गेल्या काही वर्षांत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. व्यवस्थेविरुद्ध जणू बंड पुकारत उभारलेल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अज्ञात, पण थरारक विश्वाचा फेरफटका. दोन मातब्बर संघांचा क्रिकेट सामना सुरू आहे. 30-35 हजार प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरलंय. सामना रात्रीचा असल्यामुळे चारही बाजूंनी दिव्यांचा झगमगाट आहे. सामना एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता आह...
उत्तम अंक
उत्तर द्याहटवा