आजचा बिहार- जिगसॉचे काही तुकडे
-सुरज महाजन , अजय नेमाणे ‘ युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम ’ शी संबंधित विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या काळात भटकंती करून लिहिलेले हा लेख . एक बिहारमध्ये पंधरा दिवसांचा मुक्काम ठोकून घेतलेल्या अनुभवांवर आधारित , तर दुसरा पुण्याच्या शेजारच्या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या दुर्गम भागांमध्ये फेरफटका मारून लिहिलेला . आजचा बिहार - जिगसॉचे काही तुकडे बिहार . सामाजिक बदलांची देशातील एक महत्त्वाची प्रयोगशाळा . अभ्यासकांना कोड्यात टाकणारा प्रांत . प्रचंड लोकसंख्या - गरिबी - बेकारी - बकाली - गुंडागर्दी - मागासलेपण - जातीपातींची घट्ट समीकरणं अशा अनेक कारणांसाठी देशभर प्रसिद्ध पावलेला . पण गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू पाहते आहे . या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारिता शिकणारे काही विद्यार्थी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने बिहारमध्ये जाऊन थडकले . तेव्हा त्यांना काय दिसतं ? पंधरा दिवसांच्या मुक्कामात दिसलेले आजच्या बिहारचे हे काही तुकडे . बिहार नावाचं जिगसॉ पझल जोडण्यासाठी मदत करणारे . आम्ही पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटचे पत्रकारितेचे विद्यार्थी . ...