पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुक्रमणिका - ऑगस्ट २०२०

लेख चीनशी आर्थिक युद्ध भारताला झेपेल ? :  मंगेश सोमण लॉकडाऊन काळातलं काजूआंदोलन : नंदकुमार मोरे निसर्गात माणसाची ढवळाढवळ जुनीच : निरंजन घाटे   वीर दास : द आऊटसायडर : मुकेश माचकर सैनिकहो , तुमच्यासाठी : अनिल परांजपे निमित्त : लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी लोकमान्यांचे पुण्यस्मरण : आचार्य शं . द . जावडेकर कोव्हिड : काही मुद्दे वाढत्या ‘ पॉझिटिव्ह ’ संख्येकडे नव्हे , गंभीर रुग्णांकडे लक्ष हवं : मिलिंद वाटवे जग थांबतं तेव्हा : गौरी कानेटकर जगाला हात धुवायला शिकवणारा डॉक्टर : डॉ . शंतनू अभ्यंकर कोव्हिड : काही अनुभव मुद्दा दोषारोपांचा नाही , जीवरक्षणाचा आहे : प्रशांत खुंटे कोरोनाशी दुहेरी लढाई : अभय जगताप कोरोना से डरो ना : स्वाती दाते मी एक कोव्हिड पोलीसस्वयंसेवक : वैभव केशव आयरे काही अनुभव पल्याडचे : नीलिमा कुलकर्णी ललित कायदे - भन्जक : बलराज बख्शी , अनुवाद : सुकुमार शिदोरे  

अनुभव मासिक - ऑगस्ट २०२०

इमेज
मुखपृष्ठ  छायाचित्र :  प्रणव संत

चीनशी आर्थिक युद्ध भारताला झेपेल ? - मंगेश सोमण

इमेज
लडाखच्या सीमेवर चीनने दाखवलेल्या विस्तारवादाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनविरुद्ध आर्थिक युद्धाची आघाडी उघडलेली आहे , असं सध्याचं चित्र आहे . या युद्धात भारत चीनला कितपत धडा शिकवू शकेल आणि या युद्धाची भारताला काय किंमत मोजावी लागेल ? चीनची अर्थव्यवस्था हा एक खास नमुना आहे . विकसित किंवा विकसनशील , मुक्त व्यापारवादी किंवा बंदिस्त , भांडवलशाही किंवा साम्यवादी , अशा ढोबळ वर्गीकरणांमध्ये चिनी अर्थव्यवस्थेला बसवणं नेहमीच कठीण ठरत आलंय . गेल्या शतकातलं शेवटचं दशक आणि या शतकातला सुरुवातीचा काळ हा चीनने जागतिक बाजारपेठेची फॅक्टरी बनण्याचा होता . त्यासाठी चीनच्या किनारी भागांमध्ये विदेशी भांडवल , तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापार यांच्यासाठी पायघड्या घातलेल्या होत्या . त्यांना पूरक असा स्वस्त मनुष्यबळाचा पुरवठा चीनच्या इतर भागांमधून होत होता . परिणामी बऱ्या च उत्पादन क्षेत्रांमध्ये चीन जगातला सर्वात मोठा आणि स्वस्त पुरवठादार बनला . त्यात चिनी सरकारकडून अनेक सवलती दिल्या जात होत्या . तिथले सरकारी उद्योग अनेकदा व्यावसायिक तत्त्वांना फाटा देऊन व्यवहार करत होते . शिवाय तिथली एकाधिकारी राजवट जलद निर्ण

वाढत्या ‘पॉझिटिव्ह’ संख्येकडे नव्हे, गंभीर रुग्णांकडे लक्ष हवं : कोव्हिडच्या आकड्यांचा खरा अर्थ सांगणारा लेख - मिलिंद वाटवे

इमेज
कोव्हिड - १९ चा संसर्ग महाराष्ट्रात वाढत चालला आहे . त्यामुळे लोकांमध्ये भीतीची भावना तयार होतेय . त्या पार्श् ‍ वभूमीवर कोव्हिडच्या आकड्यांचा खरा अर्थ काय , हे समजावून सांगणारा लेख . कोव्हिड रुग्णांची संख्या एकूण किती वाढली याने घाबरून जाण्याची गरज नाही . त्याऐवजी गंभीर रुग्णांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं सांगणारा . जॉन अ ‍ ॅलन पावलॅास या लेखकानी १९८८ साली इनन्युमरसी नावाचं एक पुस्तक लिहिलं . इनन्युमरसी हा शब्द तो इललिटरसीला समांतर शब्द म्हणून वापरतो . त्याचं म्हणणं असं की सामान्य माणूस शिकून साक्षर पटकन होतो , म्हणजे त्याला अक्षरं , शब्द आणि त्यांचे अर्थ चांगले समजतात . पण आकडे वाचता आले तरी आकड्यांचे अर्थ मात्र बहुतेकांना समजत नाहीत . आज कोव्हिडच्या साथीच्या संदर्भात पावलॅासच्या म्हणण्याचा पावलोपावली प्रत्यय येतो आहे . सर्व प्रकारच्या माध्यमातून आकडे नुसते फेकले जात आहेत आणि त्याचे अर्थ न कळल्यामुळेच सामान्य माणूस गोंधळलेला आणि धास्तावलेला आहे . वास्तविक मोजमाप आणि आकडे विज्ञानात खूप महत्त्वाचे असतात . पण आकडेवारी हे दुधारी शस्त्र आहे . समजले तर फारच उपयुक्त

मुद्दा दोषारोपांचा नाही, जीवरक्षणाचा आहे! - प्रशांत खुंटे

इमेज
  ओळखीतल्या कुणाला ना कुणाला कोव्हिड - १९ झाल्याची बातमी आता रोज ऐकू येतेय . काही जण फारसा त्रास न होता त्यातून बाहेर पडलेत , तर काहींना दुर्दैवाने कोरोनाचा किंवा गलथाअन व्यवस्थेचा फटका बसला आहे . कुठे कोरोना पूर्वसूचना न देता समोर उभा ठाकलाय , तर कुठे इतरांसाठी काम करणार् ‍ या कोव्हिड योद्ध्यांना त्याची लागण झाली आहे . कुठे लागण होण्याची भीती न बाळगता ही मंडळी काम करताहेत . त्यापैकी काहींचे हे अनुभव .  “ सुमितची कोव्हिड चाचणी करावी लागेल . डॉक्टरांनी सांगिलंय ...” माझ्या भावाने हे वाक्य उच्चारल्यावर माझी प्रतिक्रिया अगदीच सामान्य होती . कोरोना पॅनडेमिक सुरू झाल्यापासूनच मी घरच्यांना सांगत होतो , ‘ आज ना उद्या आपल्या अवतीभवतीच्या लोकांना कोरोनाची लागण होणार . आपल्यालाही होऊ शकते . घाबरायची गरज नाही .’ दरम्यान , आमच्या परिसरात कोरोनाने काही मृत्यू झाले . या मृत्यूंबद्दल लोक खासगी आवाजात बोलत . तो स्वर मला विचित्र वाटायचा . मी स्वत : लॉकडाऊनमुळे आपत्ती ओढवलेल्यांच्या मुलाखती घेतोय . त्यांचे प्रश् ‍ न समजून घेतोय . त्यानिमित्ताने लोकांना भेटतोय . त्यामुळे असेल कदाचित , भावाच्या मुला