चित्र :अन्वर हुसेन सुभाष अवचट हे भारतीय कलाविश्वातलं महत्त्वाचं नाव. या प्रयोगशील चित्रकाराने नुकतीच वयाची सत्तरी गाठली. त्यानिमित्ताने , त्यांचे तरुण चित्रकार मित्र अन्वर हुसेन यांनी लिहिलेला लेख. अवचट यांचं हे पोर्ट्रेटही अन्वर यांनीच चितारलेलं. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझा मित्र ‘४ , शाकुंतल’च्या दरवाज्यासमोर उभे होतो. बंद होता दरवाजा. एकदा बेल वाजवली. दार उघडलं गेलं नाही. आत कुणी आहे-नाही काही कळत नव्हतं. थांबलो तसेच थोडा वेळ. मनात खूप उत्सुकता वाटत होती त्या क्षणी. या बंद दरवाज्याच्या आत काय काय असेल ? कुठे कुठे पाहिलेली , वर्तमानपत्रात , मॅगझिन्समध्ये छापून आलेली ती चित्रं , इथेच आत असतील ना ? खूप मोठी चित्रं असतात त्यांची , असं ऐकलेलं. ते मला प्रचंड आवडलेलं त्यांनी केलेलं पोर्ट्रेट- ते असेल का इथे ?... असंख्य विचार तरळून जात होते , पण दरवाजा बंदच. दुसर्यांदा बेल दाबावी का ? नको... मित्राने आणि मी विचार केला. वळलो आणि जिना उतरून खाली आलो. शेजारीच असलेल्या होस्टेलवर राहिलो होतो आम्ही. डिप्लोमाचं वर्ष होतं. परीक्षेसाठी मुंबईला आलो होतो. आता काही दि...