भटकंती प्राचीन घाटमार्गाची : प्रणव पाटील
भटकंती प्राचीन घाटमार्गाची : प्रणव पाटील अनुभव मार्च २०२२ प्राचीन काळी सह्याद्रीच्या डोंगररांगातील घाटांमधून अनेक व्यापारी मार्ग कोकणातील कल्याण, सोपारा, चौल या बंदरांकडे जात. पुढे इतर अनेक रस्ते तयार होत गेले, तसे हे डोंगरांमधले घाटमार्ग विस्मृतीत गेले. कुसूर घाट हा सह्याद्रीतला असाच एक प्राचीन व्यापारी मार्ग. या घाटात फेरफटका मारून तो मार्ग आणि तिथल्या पठारावर राहणार्या माणसांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न. कार्ले लेणी ज्या डोंगरात आहेत, त्याच्या उत्तरेला आंध्रा नदीचं खोरं आहे. त्यावरून या भागाला आंदर मावळ असं म्हटलं जातं. पुण्याहून जुन्या महामार्गाने लोणावळ्याला जाऊ लागलं की उजव्या हाताला कान्हे गाव आहे. या गावातून टाकवे गावाकडे जाणार्या रस्त्याने पुढे गेल्यास आंध्रा नदीवर टाटांनी बांधलेलं ठोकळवाडी धरण दिसतं. या धरणाच्या कडेने जाणार्या रस्त्यावर माउ नावाचं लहानसं वड्या-वस्त्यांचं गाव आहे. या गावाजवळच्या मोरमारे वाडीतून मागच्या डोंगरावर पक्का रस्ता गेलेला दिसतो. या रस्त्याने डोंगर घाटातली वळणं घेत आपण डोंगरवाडीत पोहोचतो. डोंगरवाडी ही महादेव कोळी लोकांची लहानशी वाडी आहे. वाडीत काही