मेळघाटातील व्रतस्थ : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे - मृणालिनी चितळे । अनुभव ऑक्टोबर २०१८
मेळघाटातल्या दुर्गम वस्त्यावाड्यांचं नाव आजवर उर्वरित महाराष्ट्रात ऐकू यायचं ते तिथल्या कुपोषणामुळे, मूलभूत सोईसुविधांपासून वंचित असलेल्या कोरकूंच्या दयनीय अवस्थेमुळे. पण गेल्या काही वर्षांमध्ये मेळघाटात काम करणार्या काही व्यक्ती आणि संस्थांमुळे ही परिस्थिती बदलाच्या मार्गावर आहे. अशा बदल पेरणार्या माणसांमध्ये डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचं नाव अग्रगण्य म्हणावं लागेल.