पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुभव लॉकडाऊन विशेषांक २०२०

इमेज

अनुभव लॉकडाऊन विशेषांक २०२० - अनुक्रमणिका

विषाणूबद्दल थोडं काही हम साथ साथ है : डॉ. शंतनू अभ्यंकर लॉकडाऊनमुळे कोरोना नष्ट होत नाही : डॉ. जयप्रकाश मुलियिल लॉकडाऊन : काही प्रश्न सहापदरी संकटाच्या विळख्यात भारत : रामचंद्र गुहा लोकशाही लॉकडाऊन : सुहास पळशीकर जनहितपत्रकारितेला टाळं? : जयदेव डोळे लॉकडाऊनचे बळी कामगारांच्या आत्मसन्मानाला काळिमा : हर्ष मंदेर या शोकांतिकेला अंत नाही : शेखर देशमुख ससेहोलपट भटक्यांची : प्रशांत खुंटे लॉकडाऊन आवडे मध्यमवर्गा मध्यमवर्गाला थाळी वाजवण्याचा कार्यक्रम हवाय : रवीश कुमार भाकरी नसेल, तर कुकर केक खा : मुकेश माचकर अनुभव सात मजूर आणि बाराशे किलोमीटर : विनोद कापरी अमेरिकेत काय चाललंय? : कौमुदी वाळिंबे लॉकडाऊन इम्प्रेशन्स लॉकडाऊन, नोंदी घुसमटीच्या : अन्वर हुसेन क्वारंटाइन: राजेंद्रसिंग बेदी, अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ काही कविता थोडी टिप्पणी, बरीच अतिशयोक्ती आणि यथेच्छ खिल्ली गांधीजी आणि मी : उत्पल ब. वा.

अभूतपूर्व काळाच्या नोंदी

गेले दोन महिने आपण सारे अभूतपूर्व असा काळ अनुभवतो आहोत. दोन महिने जग पूर्ण ठप्प होऊन पडल्याचा अनुभव आपल्यातल्या कोणीही यापूर्वी घेतलेला नाही, की कोरोनासारखा झपाट्याने जगभर पसरलेला विषाणूही कधी पाहिलेला नाही. कोरोनासंसर्गामुळे झालेल्या जागतिक बळींच्या तुलनेत भारतातल्या कोरोनाबळींचा आकडा कमी असला, तरी आपल्या आरोग्यव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडला आहे. पण आपल्या देशाला त्याहून मोठा फटका बसला आहे आणि बसणार आहे तो लॉकडाऊनचा. या टाळेबंदीचे परिणाम पुढचा बराच काळ आपल्याला भोगावे लागणार आहेत. आपल्या आर्थिक विकासाची घडी विस्कटली आहे, बेरोजगारी कमालीची वाढते आहे आणि कष्टकरी, स्थलांतरित मजूर, असंघटित कामगार अशा सार्‍यांना या लॉकडाऊनने अक्षरशः देशोधडीला लावलं आहे. हा काळ आपल्या सार्‍यांसाठीच अवघड गेला असला तरी या कष्टकर्‍यांसाठी हा काळ म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरते आहे. जॉर्ज ऑरवेल असं म्हणाला होता, की ‘ऑल अ‍ॅनिमल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल.’ त्याच चालीवर आपल्याकडे हा कष्टकरी समाज आजवर कायमच अधिक दुर्दैवी, अधिक पिचला-नाडला जाणारा समाज ठरला आहे. लॉकडाऊनने तर आजवरच्या सर्व संकटांवर कहर के...

लॉकडाऊन : नोंदी घुसमटीच्या - अन्वर हुसेन

इमेज
विषाणू कसला तरी सापडलाय . तिकडे दूरच्या देशात . एक एक करत माणसं त्याच्या विळख्यात सापडतायत . आजारी पडतायत . काहींना जीव गमवावा लागलाय , अशा बातम्या येत होत्या . असेल काहीतरी आधीच्या साथींसारखीच ही एक साथ .. खूप लांब आहे ती आपल्यापासून ... मनानं काहीसं दुर्लक्षचं केलं .. पण बातम्या वाढू लागल्या .. व्हायरस वेगाने संक्रमित होऊ लागल्याच्या , माणसं मरू लागल्याच्या .. व्हायरस देशांच्या सीमा ओलांडून त्याची दहशत फैलावू लागला .. जग हडबडून गेलं . हा कुठला नवाच व्हायरस , याला अटकाव कसा करावा कुणापाशीच याची तोड नव्हती . गोंधळले सगळे इथून तिथपर्यंतचे देश . व्हायरस पसरत गेला . त्याला माणसांच्या तथाकथित सीमा मान्य नव्हत्या .. त्याला धर्मजातवंशवर्ण याच्याशी देणं घेणं नव्हतं . तो पसरत निघाला ... हळूहळू जवळ येत होता .. एक दिवस गावातच आला .. आता मात्र धडकी भरली .. गावं शहरं महानगरं देशच्या देश ग्रासले त्यानं .. एकमेकांच्या संपर्कात येणं बंद केलं पाहिजे असा उपाय शोधला गेला...

हम साथ साथ हैं : विषाणू आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचा प्रवास - शंतनू अभ्यंकर

इमेज
कोरोना विषाणूचा प्रसार , लोकांच्या मनातील भीती , त्याच्या संसर्गाबद्दलचे समज - गैरसमज   या सा ऱ्या च्या पार्श्वभूमीवर सूक्ष्मजीव आणि मानव यांच्या हजारो वर्षांपासून चालत   आलेल्या सहजीवनावर टाकलेला एक दृष्टीक्षेप . वेगवेगळे विषाणू , जिवाणू ; दर काही वर्षांनी एक नवीन साथ , एक नवीन नाव आणि एक नवीन हाहा : कार ऐकायला मिळतो . नवीन नवीन रोगजंतू येतात तरी कुठून ? तुम्हाला वाटेल आपला माल खपवण्यासाठी औषध कंपन्याच हे करत असतील . ही जैविक युद्धातली अस्त्रंच आहेत असंही तुम्हाला वाटू शकेल . कॉलेजमध्ये शिकताना तर परीक्षेत प्रश्न विचारायला सोयीचं जावं म्हणूनच हे नवे भुंगे निर्माण होतात , असं मला वाटायचं !    पण खरंतर माणूस आणि जंतू असं द्वैत कधी नव्हतंच . आपण आणि जंतू एकमेकांच्या साथीने उत्क्रांत झालेले आहोत . इतिहासपूर्व काळामध्ये माणूस झाडावरून जमिनीवर उतरला . सवानाच्या गवताळ प्रदेशात शिकार करून , भटकत , कंदमुळं खात जगत राहिला . या वनवासी , भटक्या माणसाच्या वाट्याला...