कोरोनाच्या विषाणूबरोबरच सध्या जगात त्यावरच्या उपायांच्या जाहिरातींनी धुमाकूळ घातला आहे. पण उपाय म्हणजे उपचार नव्हे आणि दावे म्हणजे औषधं नव्हेत. औषधं-लस-टेस्टिंग यामागचं विज्ञान समजावून सांगणारा लेख. वृत्तवाहिन्या कुठलाही उपाय किंवा कुठलीही गोष्ट ‘औषध सापडलं’ म्हणून दाखवू शकतात. पण वाहिन्यांवर दाखवलंय किंवा अनेकजण घेत आहेत , म्हणून ते ‘औषध’ होत नसतं! उपाय , उपचार , लस आणि औषध म्हणजे नेमकं काय ? १. एखादा रोग किंवा विकार आपल्या शरीरात आल्यावर कसा वागेल , काय परिणाम करेल , तो कधी जाईल याचा अभ्यास करणार्या मॉडर्न मेडिसिनच्या (अॅलोपॅथीला आता मॉडर्न मेडिसिन म्हटलं जातं.) शाखेला ‘पॅथॉलॉजी’ म्हणतात आणि आपल्या शरीरात इन्फेक्शन/रोग गेल्यावर किंवा विकार झाल्यावर तो शरीरात जो धुमाकूळ माजवतो , त्याचा ‘नॅचरल कोर्स’ कसा असतो , त्याला ‘पॅथॉजेनेसिस’ म्हणतात. ‘कोविड-१९’ हा विषाणू ८० ते ८५ टक्के लोकांमध्ये काहीच लक्षणं दाखवत नाही. १० ते १५ टक्के लोकांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणं दिसतात. ७ ते १० टक्के लोक आयसीयूत जातात , तर तीन ते पाच टक्के लोक मरण पावतात , असा आतापर्यंतचा अभ्यास आहे. त्याम