राजा को रानी से प्यार हो गया तिचं नाव राणी नव्हतं . त्याचंही नाव राजा नव्हतं . लॉकडाऊन उठवला जाऊ लागला , त्या काळात त्यांची पहिली भेट झाली होती . मुंबईच्या एका उपनगरातल्या रेल्वे स्टेशनावरच्या , पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडणाऱ्या पादचारी पुलावर . दोन्ही डोळ्यांत फुलं पडलेली , स्क्रू थोडा ढिला असलेली गलिच्छ कपड्यांमधली हडकलेली अधू डोळ्यांची भिकारीण होती ती . त्या पुलावर रोज भीक मागणारी . कोरोनामुळे लॉकडाऊन लागलाय हे तिला कळलं ‘ तिचा पूल ’ दोन्ही बाजूंनी अडसर लावून बंद करण्यात आला तेव्हा . ती रोज पुलापाशी यायची , अडसर चाचपायची आणि हे कृत्य करणा ऱ्यां ना शिव्याशाप देत उपनगराच्या अंधार् या सांदीकोपर् यांत परतायची . एक दिवस अडसर निघाले आणि ती पुन्हा तिच्या हक्काच्या जागेवर विराजमान झाली . रेल्वे सुरू झाली नव्हती , पुलावरून माणसांची ये - जा फारशी नव्हती . तिला भीकही फारशी मिळत नव्हती , पण हक्काची जागा परत मिळाल्याचा आनंद होता . त्याच काळात पुलावर काही गांजेकस पोरांचा मुक्काम पडला . अचकट - पाचकट बोलत चिलमीच्या कडक धुराचे झुरके मारत बसलेल्या या पोरांपैकी एकाला एकद...