स्वतःची ओळख, भोवतालाचं भान हरवून बसलेले, गलिच्छ आणि लाजिरवाणं जीणं जगणारे रस्त्यावरचे मनोरुग्ण. सार्या जाणीवाच शून्य झालेल्या या माणसांकडे समाजही भावनाशून्यपणेच पाहात असतो. अशा मनोरुग्णांना पुन्हा ‘माणसात’ आणण्याचा एक जाणता प्रयत्न डॉ. भरत व डॉ. स्मिता वाटवानी हे मनोविकारतज्ज्ञ दांपत्य करत आहे. कर्जतजवळ ‘श्रद्धा’ ही संस्था उभी करून मानसिक रुग्णांवर उपचारापासून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवण्यासाठी चालवलेल्या अथक कार्याचा, आपल्या संवेदनांना साद घालणारा परिचय.