शिक्षण म्हणजे माध्यम इंग्रजी आणि पद्धती स्पर्धेची अशी व्याख्या रूढ झालेली असताना नाशिकच्या ‘आनंदनिकेतन’ या मराठी शाळेने आनंददायी शिक्षणाच्या क्षेत्रात आपलं स्थान पक्कं केलं आहे. अवघ्या २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेच्या कर्त्याधर्त्या विनोदिनी पिटके-काळगी यांच्या कामाचा हा मागोवा.
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुदा जाहीर झाल्यानंतर तब्बल ४० लाख लोकांवर निर्वासित होण्याची वेळ आल्याने एकच गदारोळ उठला आहे. त्या पार्श्वभूमीवर आसाममधल्या सरमिसळ संस्कृतीचे हे काही अनुभव.
नागरिक ओळखपत्रात किंवा इंटरनेटवर विविध ठिकाणी जाणते-अजाणतेपणी पुरवलेली वैयक्तिक माहितीचा वापर केवळ फसवणुकीसाठीच नव्हे, तर खुद्द सरकारमार्फत नागरिकांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी केला जात असल्याच्या घटना जगभरात उघडकीस आल्या आहेत. त्या घटनांचे तुकडे एकत्र जोडून त्यांचा अर्थ लावण्याचा हा प्रयत्न.
आपल्या उदारमतवादी भूमिकेमुळे भारतीयांच्या मनांत स्वतःची खास जागा निर्माण केलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांनी स्वतःच्या भात्यात अटलबिहारींचा वारसा चालवत असल्याच्या दाव्याचा बाण खोचून घेतलेला दिसतो आहे. पण त्यांचा वारसा चालवणं म्हणजे नेमकं काय आणि आजच्या भाजपचा याबाबतचा अनुभव काय सांगतो?